गुलाबी थंडीची नाशिकला चाहूल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नाशिक - अवघ्या आठवडाभरापूर्वी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरवात झाली आहे. आज किमान तापमानात कमालीची घसरण होऊन पारा 13.4 अंशांवर आल्याने हवीहवीशी वाटणारी गुलाबी थंडीची चाहूल नाशिककरांना लागली.

दसऱ्यापासून नाशिकला थंडीची चाहूल लागते; परंतु दिवाळीपूर्वी काही दिवस आधीपर्यंत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने थंडीला विलंब होणार, असे संकेत होते. गेल्या काही दिवसांपासून दिवसा कडक उन्हामुळे कमालीचा उकाडा, तर रात्री गार वाऱ्यांमुळे गारठा, असा प्रतिकुल वातावरणाचा अनुभव नाशिककर घेत होते. आज अचानक किमान तापमानामध्ये कमालीची घसरण झाली आहे. सोमवारी 19 अंशांवर असलेले किमान तापमानाचा पारा आज 13 अंशांवर खाली आला. त्यामुळे वातावरणात सायंकाळपासूनच गारवा निर्माण झाला होता.
Web Title: nashik news cold