अकरावी प्रवेशाची उद्या पहिली यादी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

नाशिक - अकरावीच्या केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत पहिली गुणवत्तायादी सोमवारी (ता. १०) सायंकाळी पाचला ऑनलाइन स्वरूपात जाहीर होणार आहे. या यादीतून शाखानिहाय ‘कट-ऑफ’चे चित्र स्पष्ट होईल. यादीतील विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेशनिश्‍चितीसाठी मंगळवार (ता. ११)पासून गुरुवार (ता. १३)पर्यंत अशा तीन दिवसांची मुदत आहे. 

प्रवेशप्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीची चौथी सभा शिक्षण उपसंचालक कार्यालयात झाली. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक शिक्षण संचालक दिलीप गोविंद यांच्यासह व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, श्री. जोशी, प्राचार्य राम कुलकर्णी, मविप्रचे प्रशासन अधिकारी एस. के. शिंदे, डॉ. एस. के. बुवा, श्रीमती फणसाळकर, वैभव सरोदे, अशोक बागूल आदी उपस्थित होते. 

पहिली गुणवत्तायादी सोमवारी सायंकाळी पाचला ऑनलाइन स्वरूपात जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना या संदर्भात एसएमएसद्वारेदेखील अलर्ट केले जाणार आहे. या यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांना मंगळवार (ता. ११) ते गुरुवार (ता. १३) यादरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपले प्रवेश निश्‍चित करता 
येणार आहेत. 

मुख्य केंद्राशी संपर्क
प्रवेशप्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी प्रवेशप्रक्रिया मुख्यालय केटीएचएम महाविद्यालय (जिमखाना) येथे किंवा जवळच्या मार्गदर्शन केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. 

मॅनेजमेंट कोट्याकडून विद्यार्थ्यांना आस
अकरावीच्या उपलब्ध जागांपैकी एक हजार २४६ जागा मॅनेजमेंट कोट्याच्या असून, त्यावर अवघे ७१ प्रवेश झालेले आहेत. विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या; परंतु कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची भिस्त या कोट्यावरच आहे. दरम्यान, बीवायके, आरवायके-एचपीटी, एसएमआरके, नाशिक रोडचे बिटको, देवळाली कॅम्पचे सुभाष गुज्जर कनिष्ठ महाविद्यालय यांनी मॅनेजमेंट कोट्याच्या जागा सरेंडर केल्या आहेत.

Web Title: nashik news college admission