नाशिक : जेलरोड भागात कुकरचा स्फोट; एक जखमी

जयेश सूर्यवंशी
रविवार, 30 जुलै 2017

स्फोट इतका भयंकर होता, की जवळील घरांना हादरा बसला. पत्नी कामानिमित्त दसकला गेली होती. मुलगा क्लासला गेला होता. त्यावेळी हा प्रकार घडला. अशोक पाटील जेलरोडच्या छत्रपती चौकात वडापावची गाडी आहे. सकाळी नेहमीप्रमाणे आपले दैनंदिन काम करत असताना मोठया कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी टाकलेले होते.

जेलरोड (नाशिकरोड) : पिंपळपट्टीरोड लगत आवडाई नगरला मोठया कुकरचा स्फोट होऊन अशोक नारायण पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत.

स्फोट इतका भयंकर होता, की जवळील घरांना हादरा बसला. पत्नी कामानिमित्त दसकला गेली होती. मुलगा क्लासला गेला होता. त्यावेळी हा प्रकार घडला. अशोक पाटील जेलरोडच्या छत्रपती चौकात वडापावची गाडी आहे. सकाळी नेहमीप्रमाणे आपले दैनंदिन काम करत असताना मोठया कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी टाकलेले होते. कुकरची शिट्टी का होत नाही हे बघत असताना कुकरचा स्फोट होऊन कुकरचे झाकण वर उडाले. कुकरचा दणका पाटील यांच्या पोटात बसल्यामुळे ते जायबंदी झाले. अचानक झालेला आवाज ऐकत परिसरातील नागरिक जमा झाले.

त्यावेळी पाटील यांचे पोट फाटून रक्तस्राव होत होता. पाटील यांना उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाटील यांना एक मुलगा यश (6वी), एक मुलगी मृणाल (1 ली) व पत्नी असा परिवार आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Nashik news cooker blast in jailroad