नाशिक: इगतपुरी तालुक्यात शौचालयाची कामे निकृष्ट

गोपाळ शिंदे
शनिवार, 8 जुलै 2017

शौचालय व घरकुल कामांची चौकशी करण्यात यावी. यासाठी तांत्रिक सल्लागार यांसह वरिष्ठ अधिकारी ग्रामस्थ यांच्या समक्ष पाहणी करण्यात यावी. अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामे झाली असून निव्वळ शासनाचा निधी लुटण्याचे काम संगनमताने सुरू आहे. न्याय न मिळाल्यास थेट जिल्हा परिषदेवर आंदोलन करण्यात येणार आहे.
- सचिन मते, उपाध्यक्ष काँग्रेस

घोटी : इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथे स्वच्छ भारत अभियानातून बांधण्यात आलेल्या शौचालयाचे कामे निकृष्ट झाल्याने ग्रामस्थ तहसिलदार यांना मंगळवारी निवेदन देणार आहे. सदर कामांतून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप इगतपुरी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सचिन मते यांनी केला आहे.  

बांधण्यात आलेल्या शौचालयाचे काम सबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केल्याने त्याचा कुठलाही फायदा ग्रामस्थांना होताना दिसत नाही, हाताने सहजपणे सिमेंट विटा निघत असून, कुठलीही पायाभरणी व्यवस्थित झाल्याचे दिसत नसून, ड्रेनेज पाईप व बांधण्यात आलेल्या शौचालाय टाक्या पक्के बांधकाम नसल्याने ढासळत आहे. यासाठी वापरण्यात आलेले बांधकाम मटेरियल निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले आहे.

यासाठी एका शौचालय बांधणीसाठी शासनाकडून प्रत्येक पात्र लाभार्थ्यास बारा हजार रुपये देण्यात येतात. मात्र, यासाठी काही ग्रामपंचायत यांच्याकडून थातुरमातुर कारागीर हाताशी धरून बांधकामे जुलै महिन्याआत उरकण्याचा सपाट लावल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी 'स्वच्छ भारत अभियानात ग्रापंचायती ठेकेदार झाल्याने' लाभार्थ्यांना हाक ना बोंब अशा निकृष्ट सुविधांवर समाधान व्यक्त करावे लागत आहे. मात्र यामुळे बऱ्यापैकी लाभार्थ्यांचे पैसे लाटल्या जात आहे.

शासनाकडून जुलै अखेरीस नाशिक जिल्ह्या हागणदारीमुक्त करण्याचे काम सुरू असल्याने यात कागदी घोडे वरिष्ठांच्या डोळ्यांत धुळफेक करत, भ्रष्टाचाराचे कुराण जोपासना करण्याची कायमस्वरूपी व नियमितपणे सुरू राहील असे दिसत आहे.

स्वच्छ भारत योजनेचा ग्रामीण व लहानमोठ्या शहरांत अक्षरशा फज्जा उडाल्याने यातील काही लाभार्थानी स्वतःच्या पैशाने बांधकामे करून घेत अधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. तर काहींना बांधकाम करून देखील बँकेच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्याने निव्वळ जाहिरात करून काय साध्य होणार येणारा पुशिक काळ ठरवेल.

शौचालय व घरकुल कामांची चौकशी करण्यात यावी. यासाठी तांत्रिक सल्लागार यांसह वरिष्ठ अधिकारी ग्रामस्थ यांच्या समक्ष पाहणी करण्यात यावी. अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामे झाली असून निव्वळ शासनाचा निधी लुटण्याचे काम संगनमताने सुरू आहे. न्याय न मिळाल्यास थेट जिल्हा परिषदेवर आंदोलन करण्यात येणार आहे.
- सचिन मते, उपाध्यक्ष काँग्रेस

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
आजीबाईंना भेटला जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रूपात श्रावण बाळ !​
भारतातील चिनी नागरिकांना चीनकडून "सावधगिरीचा इशारा'
येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​
नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​
सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​

Web Title: Nashik news corruption in toilet work