त्र्यंबकेश्वर तहसीलदारांसह 35 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

नाशिक - त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थान जमीन गैरव्यवहार प्रकरणातील 35 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर आर वैष्णव यांनी फेटाळला. त्यात तत्कालीन दोन तहसीलदार, महसूल कर्मचारी, बिल्डर व कोलंबिका देवस्थानच्या विश्वस्तांचा समावेश आहे. मंत्रायलात सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली झालेले नाशिकचे माजी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी 200 कोटींचा जमीन गैरव्यवहार उघडकीस आणला होता. 

जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकील अजय मिसर यांनी बेकायदेशीरपणे सरकारची जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचे सांगितले. अटकपूर्व जामीनसाठी अर्ज करणाऱ्यांतर्फे बाजू मांडताना अधिकारात आणि कायदेशीर कामकाज करण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले. नायब तहसीलदार एस. एम. निरगुडे यांच्या तक्रारीवरून त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोलंबिकादेवी देवस्थानची जमीन सरकारची व धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता परस्परविक्री केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. 

Web Title: nashik news court crime Trimbakeshwar