पिंपळगाव जलाल शिवारात सव्वा लाखाचे अवैध मद्य जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

नाशिक - महामार्गालगतच्या पाचशे मीटर अंतराच्या आतमध्ये मद्य विक्रीला बंदी असताना पिंपळगाव जलाल शिवारात (ता. येवला) येथील एका हॉटेलवर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक लाख २५ हजार रुपयांचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

योगेश पोपटराव जावरे (वय ३५, रा. नामपूर, ता. सटाणा), यशवंत सोपान शिंदे (वय ३५, रा. नांदगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. महामार्गापासून ५०० मीटर अंतराच्या आतील हॉटेलमध्ये मद्य विक्रीस बंदी असताना येवला शहरात एका हॉटेलात मद्याची विक्री होत असल्याची माहिती येवला विभागाचे दुय्यम निरीक्षक सचिन श्रीवास्तव यांना मिळाली होती. तसेच कोपरगाव-येवला रोडवरून अवैध मद्याची वाहतूक होत असल्याचीही माहिती मिळाली होती. त्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पिंपळगाव जलाल भागातील हॉटेलवर छापा टाकून मद्यसाठा जप्त केला, तर अवैध वाहतूक करणारी मारुती व्हॅनही (एमएच १५, सीडी १७४९) ताब्यात घेऊन त्यातील मद्यसाठा जप्त केला. संबंधित प्रकरणी अवैध मद्याचा साठा व मारुती व्हॅन असा एक लाख २५ हजार १३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. 

Web Title: nashik news crime

टॅग्स