हॉटेल व्यावसायिकाकडून उकळली खंडणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

नाशिक - प्रेमसंबंध असलेल्या प्रेयसीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग हॉटेल व्यावसायिक असलेल्या प्रियकराला दाखवून नांदूर गावातील संशयित दीड वर्षापासून खंडणी उकळत होता. अखेरीस ब्लॅकमेलिंगला वैतागून हॉटेल व्यावसायिकाने आडगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार देताच आडगाव पोलिसांनी संशयित खंडणीखोर दीपक सहादूराव सूर्यवंशी (वय ४१) यास अटक केली असून, न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत तीन दिवसांची कोठडी सुनावली. 

हॉटेल व्यावसायिक संजय संतू काजळे (४०, रा. नांदूरगाव) यांचे औरंगाबाद रोडवर हॉटेल फॉरेन हॉटेल आहे. त्यांचे एका महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते. संशयित दीपकने काजळे व त्यांच्या प्रेयसीचे मोबाईलमध्ये लपूनछपून व्हिडिओ चित्रण केले होते. त्या चित्रणाआधारे सूर्यवंशी काजळेंची बदनामी करीत होता. नंतर त्याने ब्लॅकमेलिंग करत व्हिडिओ चित्रण व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली. गेल्या दीड वर्षात दीपकने २३ हजार रुपयांची पॅशन दुचाकी (एमएच १५, एझेड ३३४३), २४ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा लॅपटॉप घेतला, तर एक मोबाईलही असाच काजळेंकडून घेतला. त्यानंतर त्याने वारंवार पैशांची मागणी केली. महागड्या वस्तूही खरेदी करून घेतल्या. त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काजळेंनी सोन्याचे दागदागिने गहाण ठेवून पैसेही दिले. मात्र खंडणीखोर दीपकची पैशाची मागणी वाढतच गेल्याने अखेर रविवारी काजळेंनी आडगाव पोलिस ठाणे गाठत संशयित दीपक सूर्यवंशी याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे,

Web Title: nashik news crime