मुख्य संशयित संतोष उघडे गजाआड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

नाशिक - पंचवटीतील नवनाथनगरमध्ये सराईत गुन्हेगार शेखर निकम याचा भाऊ किरण निकम याच्या खून प्रकरणी मुख्य संशयित संतोष उघडे यास अखेर बुधवारी रात्री पंचवटी पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस असताना, सोशल मीडियावर भाजपच्या नेत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावरून पोलिसांनी शुभेच्छा देणाऱ्यांची चौकशी केल्यानंतर काही तासांमध्येच संशयित उघडेला अटक झाल्याने वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. 

१८ मेस किरण निकम याचा आर्थिक व हप्त्याच्या कारणावरून पाच-सात जणांच्या टोळक्‍याने नवनाथनगर येथे रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास गावठी कट्ट्यातून गोळी झाडून व तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून केला होता. या घटनेतील मुख्य संशयित संतोष उघडे फरारी होता. दोन दिवसांपूर्वी संशयित संतोष उघडे याचा वाढदिवस होता. त्यामुळे फेसबुकवर त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यास शुभेच्छा दिल्या. यामध्ये भाजपच्या नगरसेवकासह काही नेत्यांचाही समावेश आहे. ही बाब पंचवटी पोलिसांना समजताच, शुभेच्छा देणाऱ्यांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी पाचारण करण्यात आल्याने भाजप नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. चौकशी होऊन २४ तास होत नाही तोच, संशयित संतोष उघडे हा पंचवटी पोलिसांत स्वत:हून हजर झाल्याचे समजते. परंतु त्यास सापळा रचून अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र उघडे याच्या अटकेनंतर विविध चर्चा पंचवटी परिसरात सुरू झाल्या आहेत. या प्रकरणातून पुन्हा एकदा भाजपतील नेत्यांच्या गुन्हेगारांशी असलेल्या जवळिकीचीही चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: nashik news crime