अतुल अलबाडच्या पोलिस कोठडीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

नाशिक - पेठच्या नाशिक जिल्हा महिला आदिवासी संरक्षण समिती संचालित मुलींच्या बालगृहातील अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संस्थेच्या अध्यक्षा सुशीला अलबाड यांची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली, तर त्यांचा मुलगा अतुल अलबाड याच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी अतुलवर गेल्या आठवड्यात पेठ पोलिस ठाण्यामध्ये पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पेठ बालगृहाच्या अध्यक्षा सुशीला अलबाड व संशयित अतुल अलबाड यांना अटक करण्यात येऊन 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सुशीला अलबाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

Web Title: nashik news crime