पैसे पडल्याची बतावणी करत साडेसहा लाख लांबविले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नाशिक - बॅंकेतून रोकड काढून कुलकर्णी गार्डन येथील वाइन शॉपजवळ थांबलेल्या निफाडच्या कांदा व्यापाऱ्याला पैसे पडल्याची बतावणी करून त्यांचे लक्ष विचलित केले आणि त्यांच्या कारच्या सीटवर ठेवलेली साडेसहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी लांबविली. ही घटना मंगळवारी  (ता. ८) सायंकाळी साडेसहा-सातच्या सुमारास घडली.

अजय सोनी यांनी राजीव गांधी भवनसमोरील आयसीआयसीआय बॅंकेतून सहा लाख ३५ हजार रुपयांची रक्कम काढली. नंतर ते निफाडला जाण्यासाठी कारने निघाले असता, रोकड असलेली बॅग बाजूच्या सीटवर ठेवली होती. कुलकर्णी गार्डनजवळील वाइन शॉपजवळ ते थांबले असता, दोघांनी त्यांना खाली पैसे पडल्याची बतावणी केली. अजय सोनी पडलेले पैसे घेण्यासाठी कारच्या खाली उतरले. त्याचवेळी दुसऱ्या चोरट्याने संधी साधून कारच्या सीटवरील साडेसहा लाखांची रोकड असलेली बॅग उचलून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सरकारवाड्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाइन शॉप व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला असता, एका सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद झाला आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी अजय सुभाषचंद्र सोनी (रा. निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: nashik news crime