श्रीरामपूरचे तिघे सराईत नाशिकला जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

नाशिक - येथील पाथर्डी शिवारात इंदिरानगर परिसरातील एका इमारतीत आश्रय घेऊन राहणाऱ्या श्रीरामपूरमधील तिघा सराइतांच्या मुसक्‍या आज पहाटे नगर गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक पोलिसांच्या मदतीने आवळल्या. न्यायालयात नेताना नगर पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या शाहरुख रज्जाक शेख याच्यासह आणखी दोघांचा यात समावेश आहे.

पाथर्डी फाटा येथील पार्वती अपार्टमेंटमधील फ्लॅट भाड्याने घेऊन हे तिघे राहत होते. पहाटे पाच वाजता या फ्लॅटला घेरून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी शाहरुख शेख, सागर पगारे, बारकू अंबोरे या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून विदेशी बनावटीच्या दोन पिस्तुलांसह 40 राउंड, चार मोबाईल एक मोटारसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. हे तिघे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व राहता भागातील सराईत गुन्हेगार आहेत. शाहरुख (वय 25) याच्या विरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो नगरमधील चन्या बेग टोळीचा शूटर असल्याचे सांगण्यात येते.

सागर (वय 22) व बारकू (वय 21) हे दोघेही (रा. चितळी, ता. राहता) येथील सराईत आहे. संशयित शाहरुख याला नगर पोलिस एका खटल्यात न्यायालयात नेत असताना चहा पिण्याच्या बहाण्याने तो फरार झाला होता. त्यात तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून नगर पोलिस शाहरुखच्या शोधात होते. नाशिकला इंदिरानगर भागात तो लपल्याची माहिती मिळाल्यानंतर नगर पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाईत पहाटे सापळा लावला होता.

Web Title: nashik news crime