सावत्र बाप, मातेकडून मुलीचा देहविक्रय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

नाशिक - गंगापूर रोडवरील स्पा सेंटरमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला लावतानाच तिला वेश्‍याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी सावत्र बापासह मातेविरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पुणे पोलिसांकडे पीडित युवतीने फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा गंगापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. 

पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, ऑक्‍टोबर 2016 मध्ये तिच्या आईने गंगापूर रोडवरील जोए स्पामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला लावले. मात्र, त्यानंतर तिची आई व सावत्र बापाने स्पामध्ये येणाऱ्या ग्राहकांशी तिला देहविक्रय करण्यास भाग पाडले. पीडित युवतीने नकार दिला असता जबरदस्तीने तिच्याकडून वेश्‍याव्यवसाय करवून घेण्यात आला. याप्रकरणी पीडित युवतीने पुणे पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा गंगापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

Web Title: nashik news crime

टॅग्स