बेग टोळीतील आणखी एका गुंडाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

नाशिक - नगरच्या कुख्यात चन्या बेग टोळीतील आणखी एका सराईत गुंडाला देवळाली गावातील वाल्मीकनगरमधून मध्यरात्री अटक केली. संजय बबन धामणे (39) असे त्याचे असून, नवी मुंबईत मोकाअन्वये गुन्ह्यात फरार होता. नाशिकमधून आत्तापर्यंत चन्या बेग टोळीतील पाच गुंडांना अटक करण्यात आली आहे. 

नवी मुंबईतील खांदेश्‍वर पोलिस ठाण्यामध्ये सागर ऊर्फ चन्या बेग टोळीविरोधात मोकाअन्वये (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी) गुन्हा दाखल आहे. याच टोळीतील एक संशयित संजय बबन धामणे (39) हा फरार होता. गेल्या काही महिन्यांत बेग टोळीतील चार संशयितांना अटक केल्यानंतर आणखी काही साथीदार येथे लपले असण्याची शक्‍यता होती. दरम्यान, नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट एकला या अशा संशयिताची खबर मिळाली. त्यानुसार, देवळाली गावात सापळा रचला असता, संशयित संजय धामणे आढळून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अटक केली. 

या टोळीतील शाहरुख शेख, सागर पगारे व बारकू अंभोरे या तिघांना ऑक्‍टोबर महिन्यात, तर अंकुश जेधे याला 17 डिसेंबरला अटक करण्यात आली होती.

Web Title: nashik news crime