चांदवड शस्त्रसाठा प्रकरणात पाचव्या संशयितास अटक 

चांदवड शस्त्रसाठा प्रकरणात पाचव्या संशयितास अटक 

नाशिक - चांदवड शस्त्रसाठा प्रकरणामध्ये पाचव्या संशयिताला अटक करण्यात आली असून, चांदवड न्यायालयाने त्यास येत्या 28 तारखेपर्यंत नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने शिवडीतून (मुंबई) दोघांना अटक केल्याचे वृत्त "सकाळ'ने दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केले होते. मात्र, पोलिसांकडून दोघांना एकाचवेळी न्यायालयात हजर न करता एकेकाला हजर करण्यात आले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी अजूनही गूढ कायम आहे. 

चांदवड टोलनाक्‍यावर गेल्या गुरुवारी रात्री महिंद्रा बोलेरो वाहनातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. संशयित बद्रिनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमित ऊर्फ सुका, सलमान खान, नागेश बनसोडे यांना अटक केली होती. त्यानंतर शिवडीतून आणखी दोघांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. यापैकी अमीर रफिक शेख (रा. शिवडी, मुंबई) यास पोलिसांनी सोमवारी (ता. 18) चांदवड न्यायालयात हजर करून त्याची कोठडी घेतली, तर आज पाचवा संशयित वाहिब अली फैयाज अली (वय 28, रा. शिवडी, मुंबई) यास अटक करून चांदवड न्यायालयात हजर केले. त्यास न्यायालयाने 28 तारखेपर्यंत नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत या प्रकरणी पाच संशयिताना अटक करण्यात आली आहे. 

मालेगाव तालुका पोलिसांत दरोड्याचा गुन्हा 
गुरुवारी (ता. 14) सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास शस्त्रसाठा लपविण्यात आलेले महिंद्रा बोलेरो वाहन वाकी शिवारातील पेट्रोलपंपावर आले आणि अडीच हजार रुपयांचे डिझेल भरले. परंतु पैसे न देता उलट तिघा संशयितांपैकी एकाने गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पलायन केले होते. या प्रकरणी तिघा संशयितांविरोधात मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com