महिंद्र फायनान्शियलला 24 लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

नाशिक - मुंबई नाका येथील महिंद्र अँड महिंद्र फायनान्सशियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे यंत्र खरेदीसाठी बनावट कागदपत्रे सादर करून, दोन संशयितांनी 25 लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सारडा सर्कल येथील व्यावसायिकाला एकाने बनावट बिले देऊन लाखो रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला होता. 

मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्र अँड महिंद्र फायनान्सशियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. संशयित दयानंद शिरसाठ (50, रा. 111 हिरा निवास, कामटवाडा) आणि भरत मधुकर अत्तरदे (39, रा. 27, आनंदघन कॉलनी, सिडको) या दोघांनी संगनमत करून कंपनीकडे बनावट कागदपत्रे करून यंत्र खरेदीसाठीचा प्रस्ताव सादर केला होता. यासंदर्भात कर्ज वितरणानंतर कंपनीने केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीतून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीचे हर्षल शिंपी यांनी पोलिसांत फिर्याद दिली. 

Web Title: nashik news crime Mahindra Financial

टॅग्स