नाशिकला रिक्षाचालकाचा कुऱ्हाडीने वार करून पंचशीलनगरमध्ये खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

कैलास याने जवळ असलेल्या कुऱ्हाडीने विशालवर वार केल्याने विशाल रक्ताच्या थारोळ्यात पडला.

नाशिक : पंचशीलनगर येथे राहणाऱ्या रिक्षाचालकाचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. विशाल झाल्टे (वय 30) असे मृत तरुणाचे नाव असून, आज (ता. 10) रात्री साडेअकराला ही घटना घडली. घटना घडल्यानंतर पोलिसांनी लगेच संशयित वॉचमन कैलास शेजुळ (वय 35) यास अटक केली आहे.

भद्रकाली पोलिस ठाणेहद्दीत पंचशीलनगर येथे रात्री मृत विशाल आणि कैलास दारू पित असताना त्यांच्यामध्ये जुन्या भांडणावरून वाद सुरू झाला. या वेळी कैलास याने जवळ असलेल्या कुऱ्हाडीने विशालवर वार केल्याने विशाल रक्ताच्या थारोळ्यात पडला.

विशालला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेले असता, डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून माहिती घेत तत्काळ संशयित कैलास यास ताब्यात घेतले आहे.

'ई सकाळ'वरील महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nashik news crime murder rickshaw driver