विद्यार्थ्याची आत्महत्या; चौघा मित्रांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

नाशिक - आडगाव शिवारात राहणाऱ्या शुभम पाटील (वय 19, मूळ रा. पारिजात कॉलनी, जळगाव) या विद्यार्थ्याने सोबत राहणाऱ्या मित्रांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्त्या केल्याचे उघड झाले आहे.

नाशिक - आडगाव शिवारात राहणाऱ्या शुभम पाटील (वय 19, मूळ रा. पारिजात कॉलनी, जळगाव) या विद्यार्थ्याने सोबत राहणाऱ्या मित्रांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्त्या केल्याचे उघड झाले आहे.

शुभम याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार आडगाव पोलिसांनी त्याच्याबरोबर राहणाऱ्या चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अक्षय अंबारे, क्षितिज कलाल, नेताजी आटोडे, कल्पेश चौधरी अशी त्या चौघांची नावे आहेत. या प्रकरणी मृत शुभम पाटील याच्या वडील सुभाष रामभाऊ पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. धात्रक फाटा परिसरातील बळीरामनगरमध्ये शुभम पाटील हा चार मित्रांसमवेत राहत होता. गेल्या रविवारी शुभम याने खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Web Title: nashik news crime by student suicide