नाशिक जिल्ह्यात हातभट्ट्यांवर छाप्यात तीन लाखांची दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

नाशिक - जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, कळवण आणि इगतपुरी तालुक्‍यांत स्थानिक गुन्हे शाखेतर्फे सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर छापे टाकून तीन लाखांची दारू जप्त केली. नवनियुक्त पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी पदभार स्वीकारताच दुसऱ्या दिवसापासून धडक कारवाईला सुरवात केली. पोलिसांनी एका महिलेसह सात जणांना अटक केली.

पोलिस महासंचालकांनी राज्यातील अवैध दारूधंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ‘क्रॅक डाउन टू’ मोहीम सुरू केली आहे. वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी) येथे दारणा नदीलगत संशयित नवनाथ सुकदेव मालक याच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत दोन हजार ४०० लिटर रसायन, २० लिटर गावठी दारू व साहित्य, असा एक लाख २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करत त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

मालेगाव, देवळा आणि कळवण तालुक्‍यांतील अतिदुर्गम भागातही कारवाई केली. वडेल (ता. मालेगाव) शिवारात असलेल्या कॅनॉल परिसरातून सुखदेव आनंदा वाघ (वय ३७, रा. येसगाव खुर्द), हिरामण गोजर माळी (५२, रा. वडेल) यांच्या ताब्यातून ३९ हजार ३८० रुपयांची गावठी दारू, रसायन व साहित्य जप्त केले. लोहोणेर (ता. देवळा) येथील भिलाटी परिसरातून अनिल सहादू पवार व गोविंद जानू पवार (रा. लोहोणेर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडूनही ९७ हजार ५०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. गोळखाल (ता. कळवण) येथून बायजाबाई सोमनाथ पवार व शंकर वामन बर्डे यांच्याकडेही पोलिसांनी छापे टाकून १६ हजार ४०० रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले, सहाय्यक पोलिस निरीक्षक मालवे, उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, अनिल धुमसे, सतीश जाधव, हवालदार बंडू ठाकरे, शिवाजी जुंदरे, सुनील पानसरे, सुनील अहिरे, अमोल घुगे, वसंत साबळे, नामदेव खैरनार, राजू मोरे, राकेश उबाळे, देवा गोविंद, संदीप हांडगे, हरीश आव्हाड आदींचा सहभाग होता.

Web Title: nashik news crime wine

टॅग्स