आमची मम्मी आल्यावरच जेवणार!

गोकुळ खैरनार
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

उषाबाई व गणेश भदाणे मोलमजुरी करून तिघा मुलांचा सांभाळ करत होते. दीपाली दुसरीला, दिव्या पहिलीला, तर लहानगा नीलेश, असा त्यांचा छोटासा परिवार. त्यांच्या घरात बाथरूमचे काम सध्या सुरू आहे. संसाराचा गाडा चालावा म्हणून उषाबाई सणासुदीलाही कामाला जात होत्या.

अजंग/वडेल - ‘मम्मी कधी येणार आहे?... बाकी बाया येऊन गेल्या तरी अजून मम्मी का आली नाही?, मम्मी आल्यावरच मी जेवेन...’ आईच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली पाच वर्षांची चिमुरडी दिव्या येणाऱ्या प्रत्येकाला हाच निरागस प्रश्‍न विचारतेय... तशीच स्थिती सात वर्षांची दीपाली अन्‌ तीन वर्षांचा मुलगा नीलेश... आपली आई उषाबाई कधी घरी येईल याचीच ओढ या तिघा चिमुरड्यांना लागलेली... उषाबाईंच्या मृत्यूमुळे गणेश भदाणेंचा संसार उघड्यावर आलाय. तिघा चिमुरड्यांचा निरागस हट्ट पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रूंचे पाट वाहताहेत... सात सुवासिनींच्या घरी जिवाची घालमेल करणारी स्थिती आणि त्यांच्या चिमण्या जिवांना आस लागलेली आपल्या मायेच्या छत्राची...  

उषाबाई व गणेश भदाणे मोलमजुरी करून तिघा मुलांचा सांभाळ करत होते. दीपाली दुसरीला, दिव्या पहिलीला, तर लहानगा नीलेश, असा त्यांचा छोटासा परिवार. त्यांच्या घरात बाथरूमचे काम सध्या सुरू आहे. संसाराचा गाडा चालावा म्हणून उषाबाई सणासुदीलाही कामाला जात होत्या. काल त्या दोनवेळा वाहनाजवळ जाऊन परत आल्या. मात्र, दीडशे रुपये बुडतील या उद्देशाने त्या कामाला गेल्या. रोज बुडू नये म्हणून मुलांना कपडे व दिवाळीचे साहित्य गावातूनच खरेदी केले. सैताळे (जि. धुळे) येथील माहेरवाशीण असलेल्या उषाबाई दिवाळीला माहेरी गेल्या नाहीत. डिसेंबरमध्ये दत्तजयंतीच्या यात्रेला सैताळेला येते, असे त्यांनी आई-वडिलांना सांगितले 

Web Title: nashik news dada bhuse

टॅग्स