जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळले पुरलेले मृत बालक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

नाशिक - शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील क्षयरोग विभागाच्या पाठीमागील मोकळ्यात जागेत अर्धवट पुरलेले मृत बालक सापडल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, बालकाच्या शवविच्छेदनानंतर महत्त्वाची माहिती मिळू शकणार आहे. 

शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या सफाई कर्मचारी विद्या ज्ञानेश्‍वर आहिरे यांच्या फिर्यादीनुसार, आज सायंकाळी सहाच्या सुमारास त्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या क्षयरोग विभागाच्या पाठीमागे साफसफाई करीत असताना त्यांना अर्धवट पुरलेल्या स्थितीत बालक दिसले. त्यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर सरकारवाडा पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक भालेराव घटनास्थळी दाखल झाले. अर्धवट पुरलेल्या स्थितीतील पुरुष जातीच्या सुमारे एक ते सव्वा वर्षाच्या बालकास बाहेर काढण्यात आले. शवविच्छेदनासाठी ते ठेवण्यात आले. 

प्राथमिक अंदाजानुसार ते आजारी असण्याची शक्‍यता असून, ते मृत झाले असावे. तसेच आदिवासी भागातील महिला असल्याने त्यांनी रात्री क्षयरोग विभागाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पुरल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. तरीही शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट कारण समजू शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दगावलेल्या बालकांची माहितीही पोलिस घेत आहेत. त्यानुसार, मातेचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होऊ शकणार आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात या संदर्भात घातपाताच्या शक्‍यतेची चर्चा सुरू होती.

Web Title: nashik news dead body civil hospital

टॅग्स