डेंगी, कावीळ, गॅस्ट्रोच्या साथीमुळे रुग्णांत वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

नाशिक - पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून डबके तयार होऊन डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डेंगी, ताप या साथीच्या आजारांचे रुग्ण शहर-जिल्ह्यात वाढले आहेत. तसेच पावसामुळे पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण न झाल्यास वा दूषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रोची साथ ग्रामीण भागात आहे. दूषित पाण्यामुळे काही प्रमाणात काविळीचेही रुग्ण आढळून येत आहेत. 

पावसाने जूनपासूनच हजेरी लावली. जुलैअखेर दोन आठवड्यांत जिल्ह्यातील बहुतांश तालुक्‍यांत संततधार होती. त्यामुळे जिल्ह्यात काही आठवड्यांत डेंगी, ताप, गॅस्ट्रो आणि काविळीच्या रुग्णांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली. पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढली आणि या डासांमुळे ताप-मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली. त्याचप्रमाणे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथही वाढली. जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय व महापालिका आरोग्य विभागातर्फे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहर-जिल्ह्यात संयुक्तरीत्या वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या कार्यशाळा घेतल्या. त्यात परिसर स्वच्छतेसह पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाविषयी जनजागृतीची माहिती दिली होती. आरोग्य विभागास डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सातत्याने धूर फवारणीच्याही सूचना केल्या होत्या. तरीही पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला. 

पावसाळ्यापूर्वीच विशेष कार्यशाळा घेऊन सूचना केल्या. त्यामुळे साथीच्या रुग्णांमध्ये फार वाढ झाली नाही. तरीही जे रुग्ण दाखल झाले त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पावसाळ्यात पिण्याचे पाणी शुद्ध करून प्यावे. डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेतली तर साथीचे आजार पसरण्यास अटकाव होतो. 
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: nashik news Dengue jaundice gastro