शहरातील २३ खेड्यांच्या विकासासाठी दहा कोटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

नाशिक - आपल्या गावाचा विकास होईल या अपेक्षेने शहरालगतची २३ खेडी महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाली. पण, गेल्या ३५ वर्षांत खेड्यांचा पाहिजे तसा विकास झाला नाही. अजूनही नागरी समस्यांनी त्रस्त असलेल्या खेड्यांची व्यथा ‘सकाळ’मधून ‘गाव बनले व्हिलेज’ या मालिकेच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे. या मालिकेची दखल घेत महापौर रंजना भानसी यांनी तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी खेडे विकासासाठी देण्याचे आज जाहीर केले. तत्पूर्वी महापौरांनी खेड्यांच्या व्यथा मांडल्याबद्दल ‘सकाळ’चे अभिनंदन केले.

महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. पहिली दहा वर्षे प्रशासकीय राजवट होती. १९९२ मध्ये निवडणुका होऊन लोकप्रतिनिधींची सत्ता स्थापन झाली. प्रशासकीय राजवट असो, की लोकप्रतिनिधींची सत्ता महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ खेड्यांचे गावपण दूर झाले नाही. याच पार्श्‍वभूमीवर खेड्यांच्या व्यथांना वाट मोकळी करून देण्यासाठी ‘सकाळ’ने वृत्तमालिका सुरू केली. आतापर्यंत मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, नांदूर-मानूर, दसक-पंचक, टाकळी, चाडेगाव, चेहेडी, देवळाली गाव, विहितगाव, वडनेर, पिंपळगाव खांब, वडाळा, पाथर्डीचे प्रश्‍न मांडले आहेत. स्थानिक रहिवाशांनीसुद्धा मालिकेचे स्वागत करून व्यथा सोडविण्यासाठी ‘सकाळ’ पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याबद्दल अभिनंदन केले. महापौर रंजना भानसी गेल्या पाच ‘टर्म’पासून म्हसरूळ भागातून निवडून आल्या आहेत. गावाच्या समस्यांची त्यांना जाण असल्याने त्यांनी मालिकेची दखल घेतली. खेड्यांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये निधी देण्याची घोषणा त्यांनी महासभेत केली.

Web Title: nashik news development fund