वणी: पाषाणातून साकारल्या देवीच्या मूर्ती

दिगंबर पाटोळे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

भाविक ग्राहकांची मुर्ती बाबत असलेल्या अपेक्षा ज्यात देवीच्या मूर्तीचे स्त्रीरूपातील सौंदर्य, चेह-यातील स्त्रीसुलभ सोज्ज्वळपणा आणि मांगल्यपूर्ण भाव या गोष्टी डोळया समोर ठेवून रूपाला साजेसे नाक, डोळे, ओठ आणि चेह-यावरील हास्य रेखाटण्यास कसब पणास लागत लागत असते. 

वणी : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या वणी या तीर्थक्षेत्री शिल्पकारांकडून बनविण्यात येत असलेल्या देवीच्या मूर्त्यांनाही महत्त्व प्राप्त झाले असून नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर येथील बसस्थानकाजवळ शिल्पकारांनी विविध ठिकाणच्या देवींच्या मूर्ती पाषाणातून साकार करुन विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रासह गुजरात राज्यात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यात वणी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असल्याने सप्तश्रृंगी गडावर आदिमाया भगवतीचा चैत्रोत्सव व नवरात्रौत्सव हे दोन यात्रोत्सवासाठी लाखोंच्या  संख्येने भाविक गडावर हजेरी लावतात. याच काळात वेगवेगळ्या शहरे, गाव, खेडे पाड्यात नव्याने बांधलेल्या देवी मंदिरे तसेच जुन्या मंदिराचे केलेल्या जिर्णाेद्धार देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे या कालावधीत देवीच्या मुर्तीची गावकऱ्यांनी केलेल्या नोंदणी नूसार मूर्ती तयार दगडावर कोरण्याचे काम शिल्पकारांनी पूर्णत्वास नेले असून मोठ्या मूर्तींवर अंतिम हात फिरविला जात आहे. यात मंडळाच्या किंवा गावकऱ्यांच्या मागणीनूसार मूर्तीची अडीच फुट ते सात फुटा पर्यंत मूर्ती घडविण्यात आल्या आहेत. 

संगमरवरी दगडापासून बनविण्यात आलेल्या मुर्तीची देखभाल ही अवघड असल्याने व किमंतीनेही जास्त असल्याने काळ्या दगडी चिऱ्यांपासून बनविण्यात आलेले मुर्ती ह्या स्वस्त व देखभालीस सोपे जात असल्याने हृया मूर्तीची नोंदणी अधिक झाली असल्याचे मूर्तीकार विक्रम पवार यांनी सांगितले. मुर्त्यांमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या मुर्तीस सर्वाधिक नोंदणी असून दुर्गा देवी, जगदंबा माता, कालीका माता, एकवीरा माता, भवानी माता, रेडू माता आदी देवींच्या मुर्तीही नोंदणीनूसार तयार करण्यात आलेल्या आहेत. वणी येथून नाशिक जिल्ह्यासह आैरंगाबाद, कल्याण, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच गुजरात मधुन वासदा, आहवा, डांग, सुरत येथील भाविक मंडळे मूर्त्यांची नोंदणी केलेली आहे. मुर्ती नेण्यासाठी भाविक ग्रामस्थ आपल्या गावाहूनच खाजगी वाहन घेवून जागेवर विधीवत पूजा करुन मुर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी आपल्या गावी नेत आहे.

भाविक ग्राहकांची मुर्ती बाबत असलेल्या अपेक्षा ज्यात देवीच्या मूर्तीचे स्त्रीरूपातील सौंदर्य, चेह-यातील स्त्रीसुलभ सोज्ज्वळपणा आणि मांगल्यपूर्ण भाव या गोष्टी डोळया समोर ठेवून रूपाला साजेसे नाक, डोळे, ओठ आणि चेह-यावरील हास्य रेखाटण्यास कसब पणास लागत लागत असते. 

Web Title: Nashik news devi statue in wani