दीडशिंग्या काळविटाच्या दर्शनाने पर्यटक खूष

आनंद बोरा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

नाशिक - दीडशिंग्या हा ममदापूर (ता. येवला) येथील संवर्धन राखीव वनामधील आकर्षणाचा केंद्रबिंदू. भरभक्कम शरीरयष्टी अन्‌ अंगावरील रंगछटांची देणगी मिळालेले हे काळवीट पर्यटकांना न घाबरता जवळून दर्शन देत आहे. त्यामुळे पर्यटक खूष होत आहेत.

नाशिक - दीडशिंग्या हा ममदापूर (ता. येवला) येथील संवर्धन राखीव वनामधील आकर्षणाचा केंद्रबिंदू. भरभक्कम शरीरयष्टी अन्‌ अंगावरील रंगछटांची देणगी मिळालेले हे काळवीट पर्यटकांना न घाबरता जवळून दर्शन देत आहे. त्यामुळे पर्यटक खूष होत आहेत.

राजापूर, ममदापूर हे हरणांचे गाव म्हणून ओळखले जाते. पूर्वी माणसे आणि काळवीट यांच्यातील संघर्षाचे रूपांतर आता त्यांच्या मैत्रीत झाले आहे. त्याचे श्रेय वन विभागाने उभारलेल्या ममदापूर संवर्धन राखीव वनाला जाते. काळविटांच्या संवर्धनासाठी सुरू केलेल्या कामात ग्रामस्थांनीही साथ दिली. त्यामुळे काळविटांच्या संख्येत वाढ झाली. दीडशिंग्या हा या वनातील एक नर काळवीट आहे. नवात त्याचे एक स्वतंत्र विश्‍व आहे. सोनटेका टेकडी भागात दीड वर्षांपासून त्याचे दर्शन घडते.

जंगलात काळविटांना पाहणे सोपे नाही. माणसाची चाहूल लागताच ते पळून जातात; पण ममदापूरच्या दीडशिंग्याने पर्यटकांना लळा लावलाय. त्याचे नैसर्गिक सौंदर्य पाहुण्यांना खूष करते. वनविभागाचा लाडका बनलेला दीडशिंग्या छायाचित्रकारांसाठी तर चक्क "मॉडेल' झाला आहे. सुरक्षित अंतर ठेवून तो विविध पोझ देतो. खुरटी बाभूळ ही त्याचे आराम करण्याची जागा. त्याचे ओरडणे, धावणे आकर्षित करते. इतर हरणांचा कळप त्याच्या भागात फिरत नाही.

'गेल्या दीड वर्षापासून सोनटेका टेकडी परिसरात नर काळवीट पाहावयास मिळतो. नर काळवीटबरोबर झालेल्या लढाईत त्याचे एक शिंग तुटले. त्यामुळे दीडशिंग्या अशी त्याची ओळख झालीय. अगदी जवळून त्याला पाहता येत असले तरी तो माणसाळलेला नाही. तो माणसांना घाबरतो; पण इतर काळवीटांप्रमाणे तो दूर पळून जात नाही. एकाच परिसरात त्याचे वास्तव्य असल्याने तो दृष्टिक्षेपात पडतो.''
- अशोक काळे, अधिकारी ममदापूर संवर्धन वनराखीव

Web Title: nashik news didshingya black deer