दारू दुकानांविरोधाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना - महाजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

नाशिक - तिडके कॉलनीत लंबोदर ॲव्हन्यूप्रमाणेच शहरातील विविध भागांमधील दारू दुकानांना होत असलेल्या विरोधाबाबत दखल घेण्याची सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांना दिली आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ‘लंबोदर’मधील रहिवाशांनी दारू दुकानाविरोधाबद्दलचे निवेदन पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसेच महापौर रंजना भानसी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. नंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून सूचना देण्याची विनंती आमदार बाळासाहेब सानप यांनी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी ही माहिती दिली.

कायदेशीर बाबी कागदोपत्री पूर्ण करत स्थानिक विरोधाची दखल प्रशासनाकडून घेतली नाही, अशी व्यथा ‘लंबोदर’मधील रहिवाशांनी मांडत दारू दुकानाला आमचा विरोध असल्याचे पालकमंत्र्यांना सांगितले.

प्रशासनाने हट्टाने दुकान सुरू करण्याचे धोरण स्वीकारल्यास रस्त्यावर उतरून आणि न्यायालयात लढाई केली जाईल, असा इशारा महिलांनी दिला. यापूर्वी इथल्या महिलांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेऊन दारू दुकानाला विरोध दर्शविला होता. त्या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून डॉ. भामरे यांनी स्थानिक विरोधकाकडे लक्ष वेधले होते. पालकमंत्र्यांनी दारू दुकान सुरू करण्यास स्थगिती दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. पण त्यावर महिलांचे समाधान झाले नव्हते. अखेर आमदार सीमा हिरे यांनी ‘लंबोदर’मधील दारू दुकानाच्या प्रश्‍नातून तयार होणाऱ्या कायदा सुव्यवस्था मुद्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचा विश्‍वास महिलांना दिला.

‘देशस्थ ऋग्वेद’चे शिष्टमंडळ
‘लंबोदर’मधील दारू दुकानाविरोधात देशस्थ ऋग्वेद भवनच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा उघडला आहे. पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना सरकारी विश्रामगृहात गाठले. कुठल्याही परिस्थिती दारू दुकान सुरू करण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी पालकमंत्र्यांना केली.

Web Title: nashik news District Collector informed against liquor shops