नाशिकमध्ये अर्भक उपचाराविना दगावले

नाशिकमध्ये अर्भक उपचाराविना दगावले

नाशिक - जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) नवजात बालमृत्यू प्रकरण ताजे असतानाच डॉक्‍टरांनी उपचारात दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे पुन्हा नवजात बालक दगावल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. सोमवारी (ता. २५) रात्री दीडच्या सुमारास प्रसूती झाल्यानंतर बालकाचे वजन कमी असल्याने पेठहून दिव्यांग दांपत्य व त्यांचे नातेवाईक ‘सिव्हिल’मध्ये  नाशिकमध्ये अर्भक उपचाराविना दगावले पोचले. पण नवजात बालक कक्षात जागा नसल्याचे कारण देत दोन तास त्यांना बसवून ठेवण्यात आले. उपचारास विलंब होऊन पहाटे बालक दगावल्याचा आरोप नातलगांनी रुग्णालयावर केला. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणीही केली.

जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षातील समस्या व अपुऱ्या व्यवस्थेवर ‘सकाळ’ने प्रकाशझोत टाकत आवाज उठविला होता. त्यानंतर आरोग्य, पालकमंत्र्यासह सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. रुग्णालयातील भेट देत जागा, कक्षाची पाहणी करत आर्थिक तरतूदही करण्यात आली. नियोजनानुसार लवकरच काम सुरू होणार आहे. असे असतानाच ‘सिव्हिल’ची उदासीनता व डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाचा नाशिककरांना आज पुन्हा प्रत्यय आला.  

पेठ तालुक्‍यातील घनशेत (पो. कुळवंडी) येथील हेमलता जगदीश कहांडोळ (२३) या मूकबधिर असलेल्या गर्भवतीने काल रात्री दीडच्या सुमारास हरसूल रुग्णालयात बालकाला आठव्या महिन्यातच जन्म दिला. जन्मत: बालकाचे वजन एक किलो होते. त्यामुळे पुढील उपचारासाठी आज पहाटे तीनच्या सुमारास हेमलता, पती जगदीश, तिचे नातलग यशवंत जाधव आणि ताराबाई जाधव हे ‘सिव्हिल’मध्ये आले.  त्या वेळी रात्रपाळीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नवजात बालकांचा कक्ष (एसएनसीयू) येथे जागा नसल्याचे सांगत उपचाराला टाळाटाळ केली. त्यानंतर त्यांना दोन वेळा पहिल्या मजल्यावरील ‘एनएससीयू’ कक्षाकडे पाठवले, मात्र तेथेही जागा नसल्याचे सांगत रात्रपाळीच्या कर्मऱ्यांनी त्यांना पिटाळले. या नवजात बालकावर उपचार करण्याऐवजी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना आडगावच्या मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यास सांगितले.

यशवंत जाधव यांनी मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात संपर्क साधून विचारणा केली, मात्र तेथेही जागा उपलब्ध नसल्याचे कळाले. सकाळी सहाच्या सुमारास त्यांना शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले. तिथे गेल्यानंतर डॉक्‍टरांनी बालकाला तपासले असता मृत घोषित करण्यात आले. सुमारे तीन तास जिल्हा रुग्णालयाचे रात्रपाळीचे वैद्यकीय अधिकारी, ‘एसएनसीयू’ कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळ वाया घालवत हलगर्जीपणा केल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. 

पहिल्या अपत्याचा आनंद क्षणाचा.
हेमलता-जगदीश कहांडोळ या दांपत्याचे हे पहिलेच अपत्य होते. दोघेही मूकबधिर असून, मुलाला जन्म दिल्यानंतर त्यांच्यासाठी आनंद अवघ्या काही क्षणांसाठीच ठरला. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या बालकाला घेऊन आई दोन-अडीच तास रुग्णालयाच्या आवारात बसून होती. नातलग त्यास ‘एनएससीयू’मध्ये दाखल करून घेण्यासाठी गयावया करत होते; पण वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांची दया आली नाही. 

‘एसएनसीयू’ कक्षाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले; पण बाळाला ‘व्हेंटिलेटर’ची गरज होती. ती सुविधा आपल्याकडे नाही. यासाठी ‘मविप्र’ रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्याकडेही जागा नसल्याने शेवटी शताब्दी हॉस्पिटलकडे पाठविले. मुळात नवजात बालकाचे वजन कमी होते आणि प्रकृतीही चिंताजनकच होती. 
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com