डॉक्‍टरांकडून डॉक्‍टरचीच 22 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

नाशिक - एका डॉक्‍टरची अन्य डॉक्‍टरांनी 22 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. दोन योजनांमध्ये रुग्णांना दिलेल्या सेवेबद्दल मिळालेल्या रकमेचा करार झालेला असतानाही चार डॉक्‍टरांनी ते पैसे दुसऱ्या डॉक्‍टरांना न देता परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.

सुप्रीमम किडनी केअर डायलिसिसचे संचालक डॉ. देवदत्त चाफेकर आणि सोहम रुग्णालयातील संशयित डॉ. अजय परदेशी, डॉ. विजय थोरात, भरत पाटील आणि डॉ. प्रशांत जोशी यांच्यामध्ये डिसेंबर 2014 ते ऑक्‍टोबर 2015 च्या काळात सरकारच्या ईएसआयसी (एम्प्लॉइज स्टेट इन्श्‍युरन्स कॉर्पोरेशन) आणि महाराष्ट्र पोलिस कुटुंब योजने(एमपीकेवाय)मधील रुग्णांना सेवा देण्याबाबत करार करण्यात आला होता.

या करारानुसार डॉ. चाफेकर यांनी सोहम रुग्णालयातर्फे आलेल्या रुग्णांना सेवा दिली. या बदल्यात त्यांनी, "ईएसआयसी' योजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णांचे सुमारे 14 लाख 63 हजार 581 रुपये आणि "एमपीकेवाय'मधील सेवा देण्यात आलेल्या रुग्णांचे सात लाख 61 हजार 888 रुपयांची अशी एकूण 22 लाख 25 हजार 469 रुपयांची बिले सोहम रुग्णालयातील संशयित सर्व चार डॉक्‍टरांकडे पाठविली. मात्र, या काळात संशयित डॉक्‍टरांनी बिलाची रक्‍कम त्यांना न देता डॉ. देवदत्त चाफेकर यांची फसवणूक केली.

Web Title: nashik news doctor 22 lakh rupees cheating by doctor