भूलतज्ज्ञांनी तणावमुक्‍त राहून करावी रुग्णसेवा - नीलिमाताई पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

नाशिक - शस्त्रक्रिया करताना शल्यचिकित्सकाची भूमिका महत्त्वाची असते. त्याप्रमाणे भूलतज्ज्ञांवरही महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. भूलतज्ज्ञांचे काम आव्हानात्मक आहे. जबाबदारी पेलताना भूलतज्ज्ञांनी स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे. तणावमुक्‍त राहून भूलतज्ज्ञांनी रुग्णसेवा करावी, असे प्रतिपादन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी आज येथे केले.

डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भारतीय भूलतज्ज्ञ संघटने (आयएसए)च्या नाशिक शाखेतर्फे आयोजित मॉन्सून मीट परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, भूलतज्ज्ञ संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. हितेंद्र महाजन, सचिव डॉ. मनीषा कतीकर, नाशिकच्या अध्यक्षा डॉ. भावना गायकवाड, सचिव डॉ. नितीन वाघचौरे आदी उपस्थित होते. राज्यभरातून सुमारे दीडशे भूलतज्ज्ञांनी सहभाग नोंदविला. 

भूलशास्त्र हे वेगाने विकसित होत असून, त्यात रोज नवनवीन संशोधन होत आहे. या नवीन बदलांची माहिती या परिषदेच्या निमित्त देण्यात येत आहे. आज दिवसभरात डॉ. राजन दफ्तरी यांनी दुर्बिणीच्या शस्त्रक्रियांमध्ये भूलतज्ज्ञांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले, तर डॉ. प्रज्ञा सावंत यांनी बालरोग व शस्त्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. वेदनाविरहित प्रसूतीत भूलतज्ज्ञांची भूमिका याविषयी डॉ. नीलिमा गंधे यांनी माहिती दिली. डॉ. मंजू सिन्हा यांनीही या वेळी सादरीकरण केले.

दरम्यान, या परिषदेंतर्गत उद्या (ता. २०) विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. परिषद यशस्वितेसाठी डॉ. राहुल भामरे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. निकिता पाटील, डॉ. सुनीता संकलेचा, डॉ. जयश्री साळी, डॉ. अलका कोशिरे, डॉ. सीमा वर्तक आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: nashik news Doctors should be stress-free without any problem