गाणारा श्‍वान पाहायचाय..? चला मग फणसपाड्याला..!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नाशिक - तुम्ही कधी गाणारा श्‍वान पाहिला आहे का..? नाही ना! मग आपल्याला फणसपाड्याला जायलाच हवे. हरसूलपासून (ता. त्र्यंबकेश्‍वर) जवळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जयराम गुरव यांच्या झोपडीचे रक्षण करणारा मोती. जयरामबाबांनी आदिवासींचे पारंपरिक वाद्य तारफा वाजवण्यास सुरवात करताच, तो सूर लावतो.

जयरामबाबा लहानपणापासून तराफा वाजवितात. परिसरातील पाड्यांवर त्यांची ही कला प्रसिद्ध आहे. पत्नी जन्याबाईही तारफा वाजवतात. गुरव कुटुंबीयांना मोतीचा सांभाळ केला. नवीन माणूस घराजवळ दिसला की, मोती जोरजोरात भुंकण्यास सुरवात करतो. हाच मोती जयरामबाबांनी तारफा वाजवण्यास सुरवात करताच, स्वर लावून गाऊ लागतो. तारफामधून बाहेर पडणारे स्वर मोती तोंडातून काढतो. बाबा तारफा स्वतःच बनवितात. डांगराचा उपयोग त्यासाठी करतात. त्यांच्या घरात चार तारफा लटकून ठेवलेले पाहायला मिळतात. यंदा जास्त पाऊस झाल्याने त्यांचे भाताचे पीक वाया गेले. पण बाबा खचले नाहीत. त्यांच्या कुटुंबाने अधिक जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत. संगीत मानसिक ताण हद्दपार करते, असे बाबा आवर्जून सांगतात. मोती लहानपणापासून बाबांकडे राहतो. बाबा तराफाचा सराव सुरू करतात, त्या वेळी तो शेजारी बसतो आणि साथसंगत करतो.

Web Title: nashik news dog