मोठा व्यावसायिक होण्यासाठी इच्छेसोबत चीडही असावी - डॉ. धनंजय दातार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

नाशिक - व्यवसायात उलाढाल जास्त असण्यापेक्षा नफ्याचे प्रमाण जास्त असेल तो उत्तम व्यवसाय ठरतो. केवळ मोठा व्यावसायिक, उद्योजक होण्याची इच्छा असून चालत नाही, तर ते ध्येय प्राप्त करण्यासाठी चीडही असणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन दुबईतील अल्‌ अदिल कंपनीचे संचालक तथा ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी शुक्रवारी (ता. २६) केले.

गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास संकुलमधील डॉ. कुर्तकोटी सभागृहात संस्कृती वैभव संस्थेतर्फे झालेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. कार्यक्रमाची निर्मिती मुंबईतील मिती क्रिएशन्सची होती. मिती क्रिएशन्सच्या संचालिका उत्तरा मोने यांनी मुलाखत घेतली. याप्रसंगी वंदना दातार, उद्योजक धनंजय बेळे, बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे, आनंद राठी, संस्कृती वैभवचे अध्यक्ष नंदन दीक्षित, उपाध्यक्ष पी. एस. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ. दातार म्हणाले, की कुठल्याही कामाची मनात लाज बाळगायला नको. कुठलेही काम छोटे नसते. ते काम आपण व्यवसाय म्हणून करत असल्याने स्वत:ला झोकून द्यावे. कितीही श्रीमंत झालो, तरी कमीत कमी साधनांमध्ये समाधानी राहायला शिकावे. प्रास्ताविकात संस्कृती वैभवचे अध्यक्ष नंदन दीक्षित यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. मुंबईतील ऑपेरा हाउस येथे होणाऱ्या डॉ. दातार यांच्या ‘मसालाकिंग’ पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मोने यांनी केले.

Web Title: nashik news dr dhananjay datar talking