जगण्याची दिशा दाखविणारी शिक्षणपद्धती असावी - डॉ. ताकवले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

नाशिक - मूल्य जोपासताना त्यावर आधारित शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून सामाजिक परिवर्तन घडविणे, हे शिक्षण पद्धतीचे अंतिम ध्येय असले पाहिजे. येत्या काळात विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर शैक्षणिक विकासासाठी करावा. विद्यार्थ्यांना शिक्षणातून जगण्याची दिशा दाखविणारी शिक्षणपद्धती निर्माण करण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांनी आज येथे केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम झाले. त्यात विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात डॉ. ताकवले यांचे व्याख्यान झाले. कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य आमदार प्रा. देवयानी फरांदे, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे उपस्थित होते. सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण व ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, सुरक्षा व कामगार महिला सुविधा केंद्राचे उद्‌घाटन आणि विद्यार्थी, कर्मचारी सेवेच्या नवीन वाहनाचे उद्‌घाटन झाले.

डॉ. ताकवले म्हणाले, की आजची शिक्षणपद्धती आशयावर आधारित आहे. आशय समजावून शिकवला जातो. त्यातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होतो. एकविसावे शतक तंत्रज्ञान क्रांतीचे शतक आहे. आजच्या काळात मूल्यांवर आधारित नवीन शिक्षणपद्धतीचा विचार करायला हवा. आमदार प्रा. फरांदे यांनी, विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रांना उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष पुरविण्यास सांगितले. 

माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. भोंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

डिजिटल क्रांतीमुळे सकारात्मक बदल
कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन म्हणाले, की डिजिटल क्रांतीमुळे समाजजीवनाशी संबंधित सर्व घटकांप्रमाणेच शिक्षणक्षेत्रातही अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. गरजांवर आधारित नवीन शिक्षण घेण्याची, तसेच अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याची सोयदेखील तंत्रज्ञानावर आधारित दूरशिक्षण प्रणालीद्वारे उपलब्ध झाले आहे. 

Web Title: nashik news dr. ram takwale