रुग्णांच्या जिवाशी खेळतात औषध कंपन्या - डॉ. मृदुला बेळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

नाशिक - पेटंटचे आयुष्य वीस वर्षांचे असते. हा सरकार व औषध कंपनी यांच्यातील करार असून, तो संपला की जेनेरिक औषधांची निर्मिती होते. स्वातंत्र्यापूर्वी भारतात औषधे तयार होत नव्हती, तर पूर्णपणे आयात करावी लागत होती. बहुसंख्य औषध कंपन्या संशोधनाच्या नावावर मार्केटिंगवर अधिक खर्च करतात. त्यामुळे औषधाच्या किमती अनावश्‍यकपणे वाढतात. याप्रकारे औषध कंपन्या सामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळच करतात, अशी खंत डॉ. मृदुला बेळे यांनी आज येथे व्यक्त केली.

ज्येष्ठ लेखिका व शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेंतर्गत तिसरे पुष्प ‘कथा ः औषध आणि पेटंटची’ या विषयावर त्यांनी गुंफले. गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात झालेल्या व्याख्यानास औषधनिर्माणसह वैद्यकीय शाखांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

डॉ. बेळे म्हणाल्या, की कुठल्याही संशोधनावर पेटंट घेण्याची गरज नाही. मात्र, ते चोरी होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळेच औषध निर्माणशास्त्रात पेटंटची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. पेटंटशिवाय कोणताही औषध उद्योग चालूच शकत नाही. स्वातंत्र्यापूर्वी भारतात सर्वच प्रकारची औषधे आयात करावी लागत होती. मात्र, आज भारत औषधनिर्माणशास्त्रात जगातील तिसरा मोठा निर्यातदार देश बनला आहे. औषध कंपन्यांनी संशोधनावर खर्च करणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने काही कंपन्या संशोधनावर नव्हे; तर मार्केटिंगवर अधिक खर्च करून सामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळतात. बाजारीकरणाच्या प्रक्रियेत वैद्यकीय क्षेत्राची समावेश होणे समाजसाठी घातक आहे. महागड्या औषधांमुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकाला वंचित राहावे लागत आहे. जेनेरिक औषधवापरासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. दत्तात्रय भार्गवे यांनी डॉ. बेळे यांचे स्वागत केले. डॉ. वृंदा भार्गवे यांनी व्याख्यानमालेचे प्रास्ताविक केले.

Web Title: nashik news Drug companies that play with patients' lives