महापालिकेच्या पाच निवडणुकांचे दस्त होणार नष्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नाशिक - महापालिकेच्या १९९२ पासून पार पडलेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकांचे दस्ताऐवज नष्ट केले जाणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव निवडणूक शाखेने तयार केला असून, आयुक्तांच्या मान्यतेनंतर निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर तीन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करून त्यांच्यासमोर त्या दस्तांची विल्हेवाट लावली जाणार आहे.

महापालिकेची स्थापना १९८२ ला झाली. दहा वर्षे प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर १९९२ मध्ये पहिली निवडणूक पार पडली व प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींतर्फे शहराचा कारभार सुरू झाला. १९९२ नंतर १९९७, २००२, २००७, २०१२ २०१७ मध्ये निवडणूक पार पडली. १९९२ ते २०१२ पर्यंत झालेल्या पाच निवडणुकांचे दस्तऐवज महाकवी कालिदास कलामंदिरात पत्र्यांच्या पेट्यांमध्ये सीलबंद ठेवण्यात आले आहेत. पण स्मार्ट सिटींतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने सध्या तोडफोड सुरू झाली आहे. महाकवी कालिदास कलामंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आलेले दस्ताऐवज हलवावे लागणार आहेत. महापालिका मुख्यालयात इतरत्र सामान ठेवण्यास जागा नाही. पाच निवडणुकांच्या दस्ताऐवजांची विल्हेवाट लावण्याचा प्रस्ताव निवडणूक विभागाकडून तयार करण्यात आला आहे.

मान्यतेनंतरच सारं काही!
आयुक्तांच्या मान्यतेनंतर निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांच्या समितीसमोर दस्ताऐवज नष्ट केले जाणार आहेत. निवडणूक झाल्यानंतर एक वर्षाने दस्ताऐवज नष्ट करता येतात. न्यायालयीन दावे असल्यास कोर्टाला कागदपत्रे सादर केल्यानंतर दस्ताऐवजांचा उपयोग होत नाही. संगणकीकरणामुळे संगणकाच्या हार्ड डिस्कमध्ये डाटा सेव्ह केला जात असल्याने कागदपत्रांचा उपयोग नसल्याने २०१७ वगळता इतर महापालिका निवडणुकांचे दस्ताऐवज नष्ट केले जाणार आहेत.

Web Title: nashik news election