इलेक्‍ट्रिकल व्यवसायालाही घरघर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

बांधकाम व्यवसायाशी निगडित सव्वाशेहून अधिक व्यवसाय आहेत. एक बांधकाम प्रकल्प अनेकांना रोजगार देतो. बांधकाम व्यवसायाशी संबंधित अनेक व्यवसायांपैकी एक म्हणजे इलेक्‍ट्रिकल व्यवसाय होय. गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या बांधकामांमुळे इलेक्‍ट्रिकल व्यवसायात तब्बल ३५ टक्के घसरण झाली आहे. रुपयांत हेच नुकसान तीनशे कोटी आहे.

बांधकाम व्यवसायाशी निगडित सव्वाशेहून अधिक व्यवसाय आहेत. एक बांधकाम प्रकल्प अनेकांना रोजगार देतो. बांधकाम व्यवसायाशी संबंधित अनेक व्यवसायांपैकी एक म्हणजे इलेक्‍ट्रिकल व्यवसाय होय. गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या बांधकामांमुळे इलेक्‍ट्रिकल व्यवसायात तब्बल ३५ टक्के घसरण झाली आहे. रुपयांत हेच नुकसान तीनशे कोटी आहे.

बांधकाम व्यवसायाशी निगडित असलेल्या इलेक्‍ट्रिकल व्यवसायाची दोन वर्षांत ३५ टक्‍क्‍यांहून अधिक घसरण झाली आहे. शहरात दोनशेहून अधिक ठेकेदार आहेत. बांधकामे बंद पडल्याने त्यांच्या व्यवसायावरसुद्धा ३५ ते ४० टक्‍क्‍यांनी परिणाम झाला आहे. सरासरी वार्षिक दहा ते पंधरा लाखांपर्यंत एका इलेक्‍ट्रिकल दुकानाचा व्यवसाय होतो. तीनशे इलेक्‍ट्रिकल मर्चंट्‌स आहेत. 

 कॉन्ट्रॅक्‍टर, इलेक्‍ट्रिकल मर्चंट्‌सचा विचार करता दोन वर्षांपासून बंद असलेल्या बांधकामामुळे सरासरी तीनशे कोटींचा फटका बसला आहे. इलेक्‍ट्रिकल प्रकारात स्वीच, वायरपासून पंखे, बल्ब, ट्यूबलाइट आदींचा समावेश होतो. प्रकारानिहाय विचार करता प्रत्येक वस्तूच्या उत्पादनावर कमी-अधिक प्रमाणात परिणाम झाला आहे. इलेक्‍ट्रिकलच्या बाबतीत मर्चंट्‌सच्या झालेल्या नुकसानीचाच विचार झाला आहे. त्याव्यतिरिक्त या व्यवसायात काम करणाऱ्या कुशल कामगार, इलेक्‍ट्रिशियनचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

इलेक्‍ट्रिक मर्चंट्‌स असोसिएशनच्या माहितीनुसार, शहरात साडेतीन हजाराहून अधिक ठेकेदार आहेत. त्यातील किमान पावणेदोन हजार ठेकेदारांच्या हातांना काम नाही. सध्या ज्यांना काम आहे ते कमी मार्जिनमध्ये काम करताहेत. एका कॉन्ट्रॅक्‍टरच्या हाताखाली किमान तीन ते चार लोक काम करतात. या घटकांचा रोजगार हिरावला गेला आहे. नव्याने बांधकाम परवानगी सुरू झाली, तरी इलेक्‍ट्रिकचे काम इमारत पूर्ण झाल्यानंतरच सुरू होते. त्यामुळे इलेक्‍ट्रिकल व्यवसायाची बिघडलेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी जाईल. इलेक्‍ट्रिकल ठेकेदार व कारागीर व्यवसायासाठी अन्य शहरांत स्थलांतरित होत असल्याचे चित्र सध्या  दिसत आहे.

इलेक्‍ट्रिकल व्यवसायाला साधारण तीनशे कोटींचा फटका बसला आहे. अजून सहा महिने अशीच परिस्थिती कायम राहिल्यास हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडून जाईल.
- दीपक भुतडा, अध्यक्ष, इलेक्‍ट्रिकल मर्चंट्‌स असोसिएशन

Web Title: nashik news Electrical business