वडाळागाव परिसरातील  ३५० अतिक्रमणांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

इंदिरानगर - वीस वर्षे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या वडाळा येथील शंभरफुटी रस्त्याची आज गावठाणातील आणि सावित्रीबाई फुले वसाहतीमधील सुमारे ३५० अतिक्रमणे हटविण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. किरकोळ विरोध वगळता अतिक्रमण मोहीम झाली. पाच जेसीबी, चार ट्रक, अतिक्रमण विभागाचे शेकडो कर्मचारी आणि मोठ्या पोलिस बंदोबस्त मोहिमेदरम्यान होता. 

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सुनीता कुमावत, पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त सचिन गोरे, फुलदास भोये, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, निरीक्षक कुमार चौधरी यांच्या पोलिस बंदोबस्तात आज सकाळी अकराला अतिक्रमण हटविण्यास सुरवात झाली. 

अनेकांनी घरपट्टी, वीजबिले दाखवून मोहीम थांबविण्याची विनंती केली. बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने कारवाईत अडथळा येत होता. वारंवार पोलिसांना ध्वनिक्षेपकाद्वारे गर्दी हटविण्याचे आवाहन करावे लागत होते. जवळच असलेल्या घरकुलांच्या इमारतींमध्ये घरकुल मिळूनही अनेकांनी अनधिकृत घरे तशीच ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली. महापालिका कर्मचाऱ्यांकडून अतिक्रमण काढलेल्या सर्व घरांचा पंचनामा करण्यात आला. 

बहुतांश नागरिकांना घरकुले मिळाली आहेत. अनेकांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे दोन-तीन दिवसांत या सर्वांना घरकुलातील योजनेमध्ये घरकुल वाटप करण्यात येणार आहे. काल (ता. १५) स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून घेणाऱ्या ४७ लाभार्थींना घरकुलांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. उर्वरित नागरिकांचीही सखोल चौकशी करून नियमात बसणाऱ्यांना घरकुल योजनेत घर दिले जाईल. येथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले जाईल. त्यानंतर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. माजी नगरसेवक सुनील खोडे, सचिन कुलकर्णी आदींनी भेट देऊन नेमक्‍या कारवाईची माहिती  जाणून घेतली.

Web Title: nashik news encroachment