एक हजार मेगावॉट ऊर्जा बचतीचे उद्दिष्ट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नाशिक - महाऊर्जाने केलेले परीक्षण आणि नवी दिल्लीच्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी (बीईई)च्या आकडेवारीनुसार राज्यात तीन हजार 700 मेगावॉट वीज उत्पादन क्षमता वाढ बचत शक्‍य आहे. तसेच 20 ते 30 टक्के इंधन बचतीची शक्‍यता आहे. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून राज्याचे पंचवार्षिक ऊर्जा संवर्धन धोरण आखताना सरकारने ऊर्जा बचत आणि कार्यक्षमता कार्यक्रम राबवून एक हजार मेगावॉट ऊर्जेच्या बचतीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. 

ऊर्जा बचतीच्या जोडीला कार्बन उत्सर्जन आणि इंधनाच्या अनुदानाने बोजा कमी करण्याचे लक्ष्य सरकारने निर्धारित केले आहे. ऊर्जा संवर्धन धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये पथदिवे, पाणीपुरवठा, घरगुती, व्यावसाय व उद्योग, कृषी या क्षेत्रांमध्ये ऊर्जा बचतीची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि त्यासाठी राज्यात आवश्‍यक मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ऊर्जा बचतीसाठी कार्यक्षमतेने तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन देणे, सरकारी इमारती, निमसरकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांनी ऊर्जा बचतीस विशेष प्राधान्य देणे, शाळा, महाविद्यालय, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्तरावर ऊर्जा संवर्धन विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करणे या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. 

वाहतूक क्षेत्राची ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी इलेक्‍ट्रिक कार अथवा स्कूटर यांच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या वाहनांची सर्वसामान्यांना ओळख व्हावी, म्हणून खरेदीसाठी अर्थसाह्याची योजना महाऊर्जाकडून राबवण्यात येणार आहे. 

Web Title: nashik news Energy saving