करमणूक कराची टांगती तलवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

'जीएसटी'नंतरही 15 सप्टेंबरपर्यंतच माफ

'जीएसटी'नंतरही 15 सप्टेंबरपर्यंतच माफ
नाशिक - शासनाने "एक देश एक कर' घोषणा करीत, वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू केला, तरी करमणूक कर महाराष्ट्रात 15 सप्टेंबरपर्यंत माफ आहे. जीएसटी लागू झाल्याने करमणूक कर आकारणीत मोठे फेरबदल झाले आहेत. मुंबईसह मोठ्या महानगरांतील नागरिकांना जीएसटी लाभदायक ठरला आहे, तर लहान महापालिकांसह छोट्या शहरांतील नागरिकांवर भुर्दंड वाढला आहे. त्यामुळे शासन करमणूक कर आकारणीबाबत फेरआढावा घेत आहे.

फेरआढाव्यानंतर करमणूक कराबाबत फेरनिर्णय होणार आहे. तशी अधिसूचना राज्य शासनाने काढली आहे. त्यात, 15 सप्टेंबरपर्यंत करमणूक करात माफी असेल असे म्हटले आहे. त्यामुळे जीएसटीमुळे करमणूक कर घटल्याचा आनंद क्षणिक ठरण्याची चिन्हे आहेत.

1 जुलैपासून नाटकावर जीएसटीरूपाने 18 टक्के कर सुरू झाला आहे. आतापर्यंत नाटकांवर कर शुल्क नव्हते. याशिवाय केबलपोटी प्रतिसेट 45 रुपये आणि अधिक 15 टक्के सेवाकर वसूल होत असे. त्यामुळे प्रतिकेबल सेटला ग्राहकांना महिन्याला सरासरी 45 रुपये कर शुल्क मोजावे लागत असे. आता 90 रुपये कर शुल्क मोजावे लागणार आहे.
वॉटर पार्कचे शुल्क कमी झाले आहे. राज्यातील क वर्ग व त्याहून लहान आकाराच्या महापालिकांच्या क्षेत्रात करमणूक कराचा भुर्दंड वाढला आहे, तर मोठ्या महानगरांना मात्र जीएसटीमुळे लाभ होणार असल्याने त्याविरोधात ओरड सुरू झाली आहे.

सप्टेंबरपर्यंत सवलत
करमणूक कराच्या अनुषंगाने शासनाने अधिसूचना काढली आहे. त्यानुसार, जीएसटीमुळे सप्टेंबरपर्यंत करमणूक करात सवलत राहील, असे म्हटले आहे. तोपर्यंत जीएसटी व करमणूक कर वसुली याचा आढावा घेऊन शासनाकडून सप्टेंबरमध्ये करमणूक कराविषयी धोरण स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच जीएसटीमुळे करमणूक कराच्या आकारणीत सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळेल, त्यानंतर पुन्हा जीएसटीवर करमणूक कराचा भुर्दंड बसू नये, ही अपेक्षा आहे.

करमणुकीचा प्रकार सेवाकरासह जुने दर जीएसटी फरक (टक्‍क्‍यांत)
सिनेमागृह 100 रुपये शुल्क
मुंबई शहरासाठी 28 18 10 टक्के घट
मुंबईशिवाय शहरे 26 18 ते
अ वर्ग महापालिका 23 18 06 टक्के वाढ
ब वर्ग महापालिका 20 18
क वर्ग महापालिका 16 18
200 रुपये तिकिटावर (मुंबई) 29.6 28 1.6 टक्के घट
मुंबईशिवाय शहरे 27.2 28 ते 15.55 वाढ
अ वर्ग महापालिका 24.2 28
ब वर्ग महापालिका 20.8 28
क वर्ग महापालिका 17.2 28
इतर महापालिका 12.45 28
केबल डीटीएच 75 रुपये 90 रुपये 15 टक्के वाढ
वॉटर पार्क 31.5 टक्के 28 टक्के 3.5 टक्के घट
नाटक (250रु. अधिक तिकीट) 00 00 18 टक्के

Web Title: nashik news entertainment tax increase