माध्यमिक शाळेत शनिवार हा ‘इंग्लिश डे’ म्हणून होणार साजरा

माध्यमिक शाळेत शनिवार हा ‘इंग्लिश डे’ म्हणून होणार साजरा
माध्यमिक शाळेत शनिवार हा ‘इंग्लिश डे’ म्हणून होणार साजरा

खामखेडा (नाशिक): माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील इंग्रजी विषयाची भीती असते. ती दूर व्हावी, जागतिक भाषा सहज, सोपी वाटावी म्हणून शिक्षण विभागाने ‘कंटिन्युअस हेल्प टू दी टीचर ऑफ दी इंग्लिश फॉम सेकंडरी स्कूल’ (चेस) या उपक्रमाचा आरखडा तयार केला आहे. त्यात नववी व दहावी वर्गाच्या राज्यभरातील १५ हजार शिक्षकांना अध्यापनाचे धडे दिले जातील. त्याचा राज्यातील ३० लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. यापुढे प्रत्येक माध्यमिक शाळेत शनिवार हा ‘इंग्लिश डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

शालेय स्तरावर गणितासह इंग्रजी भाषेबाबत ही विद्यार्थ्यांमध्ये भीती असते. कौशल्याधिष्ठित विषय शिक्षकांनाच अवघड असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे अवघड. अशावेळी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनाच आधी विषयाचे धडे दिले जाणार आहेत. त्यानंतर त्यांनी त्यानुसार शाळेमध्ये अध्यापन करायचे आहे. इयत्ता नववीस दहावीच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. विद्या प्राधिकरणाच्या पुढाकाराने ‘माध्यमिक शाळांमधील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी सातत्यपूर्ण मदत’ प्रकल्पातून इंग्रजी विषयांच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. जागतिकस्तरावरील इंग्रजी शिकविण्याची पद्धत, शैक्षणिक साहित्य, विषयातील अत्याधुनिक अभ्यासक्रमाचे अध्ययन कसे करायचे, भाषा विकास, वर्ग व्यवस्थापन आदी या प्रशिक्षणात शिकविले जाणार आहे. त्यासाठी इंग्रजी टिचर फोरमही तयार करण्यात आले आहेत. राज्यभरातील विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्यातील इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना तशेच प्राथमिक शिक्षकांना समृद्ध करण्यासाठी हे सगळे शिक्षण आजपर्यंत ब्रिटिश कौन्सिल देत होते. मात्र, हा प्रकल्प स्वतः शिक्षण विभागाचा असणार आहे. प्रशिक्षणानंतर शिक्षक शाळांमध्ये अध्यापनात यानुसार बदल करतील.

शनिवारी ‘इंग्लिश डे...’
इंग्रजी विषयाचे महत्त्व वाढावे यासाठी माध्यमिक शाळांमध्ये आठवड्यातील शनिवार हा ‘इंग्लिश डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या दिवशी प्रार्थना, परिपाठ इंग्रजीतून करण्यात येणार आहे.शिक्षकांनी विद्यार्थी, सहकाऱ्यांशी इंग्रजीतून संवाद साधणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांना जास्तीत जास्त इंग्रजी बोलण्याचा सराव होईल. त्याबाबत शासनस्तरावरून नुकतीच औरंगाबाद येथे बैठक संपन्न होत या उपक्रमाविषयी प्रक्रिया सुरू झाली आहे.

या विषयावर लक्ष केंद्रित
शिक्षकांमध्ये भाषिक कौशल्याचा विकास, व्यावसायिक विकास, टेक्नोसॅव्ही होणे, नवीन क्षमता विकसित करणे, सोशल मीडियाचा अध्यापनासाठी उपयोग आदींचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाणार आहे. त्यासाठी ५० शिक्षकांचा एक गट असेल. तालुक्यातील शिक्षकांचा एक गट दर महिन्याला एकत्र येऊन इंग्रजीबाबत चर्चा करून अध्यापनात बदल करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com