चुकीच्या कर्जमाफी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

या बाबतचे सविस्तर वृत्त असे, की लासलगाव येथे कोल्ड स्टोरेजच्या उदघाटनासाठी नैताळे येथुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नैताळे परिसरातील शेतकऱ्यांनी आज सकाळी आकरा वाजता शेतकरी व्यावसायिक यांनी उत्सफुर्तपणे गाव बंद ठेवले. मुख्यमंत्र्याचा निषेध नोंदवण्यासाठी शांततेच्या मार्गाने येथील वेशीत टाळ वाजवत नाशिक औरंगाबाद महामार्गावर गोमुत्र आणि दुध टाकत आपला रोष व्यक्त केला.

निफाड : शासनाने कर्जमाफी दिलेली आम्हाला मंजूर नाही सरसकट कर्जमाफी दिलेली नसल्याने नाशिक औरंगाबाद महामार्गावरील नैताळे गावाने गाव बंद ठेवून चुकीच्या कर्ज माफीचा निषेध नोंदवत महामार्ग गोमुत्राने धुण्याचे अनोखे अांदोलन शेतकऱ्यांनी केले.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे, की लासलगाव येथे कोल्ड स्टोरेजच्या उदघाटनासाठी नैताळे येथुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नैताळे परिसरातील शेतकऱ्यांनी आज सकाळी आकरा वाजता शेतकरी व्यावसायिक यांनी उत्सफुर्तपणे गाव बंद ठेवले. मुख्यमंत्र्याचा निषेध नोंदवण्यासाठी शांततेच्या मार्गाने येथील वेशीत टाळ वाजवत नाशिक औरंगाबाद महामार्गावर गोमुत्र आणि दुध टाकत आपला रोष व्यक्त केला. झालेली कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. त्यासाठी शासनाने संपुर्ण कर्जमाफी केलीच पाहिजे, अशी मागणी केली दरम्यान नैताळेतील शेतकऱ्यांनी सरसकट कर्ज माफ करा, सातबारा कोरा झालाच पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झालेच पाहिजे.

भाजप सरकारचा निषेध अश्या टोप्या शेतकऱ्यांनी घालत मागच्या वेळी आक्रमक अांदोलन केलेल्या शेतकऱ्यांनी आज गांधीगिरी करत गोमुत्र दुध शिंपडत अनोखे अंदोलन केले. दरम्यान आज येथून मुख्यमंत्री जाणार असल्याने नैताळेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी रस्त्यावर जमणाऱ्यांना पोलिसांनी पांगवत परिस्थितीवर लक्ष् ठेवुन होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Nashik news farmer agitation against government