येवल्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वाहिली श्रध्दांजली

संतोष विंचू
मंगळवार, 20 मार्च 2018

"अन्नदाता असलेला बळीराजाच्या पदरी नेहमीच या ना त्या कारणाने हेटाळणीच पडत आहे. येवला हे शेतकरी चळवळीचे केंद्र होते अन् आजही आहे, त्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रस्थापित राजकर्त्यावर शेतकऱ्यांचा आसूड उगारणाऱ्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग या एकदिवसीय उपोषण केले."
- सत्येन मोहन गुंजाळ,उपोषणार्थी

येवला : येथील शेतकरी कार्यकर्त्यांनी अन्नदात्यासाठी एक दिवसीय अन्नत्याग  उपोषण केले. तसेच महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली वाहून उपोषण सोडण्यात आले.

जगाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱयांविषयी  सहवेदना व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. चिलगव्हाण (यवतमाळ)  येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी त्यांची पत्नी व चार मुलासह १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. ही 
शेतकऱयांची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. त्यानंतर ३२ वर्षात सातत्याने शेतकऱयांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. यासाठी आपण या देशाचे 
नागरिक म्हणून कायकरू शकतो? या संकल्पनेतून अन्नदात्यासाठी अन्न त्याग ही 
संकल्पना अमर हबीब यांनी मांडली.

त्यानुषंगाने आज सोमवारी (दि.१९) शहरातील शेतकरी कार्यकर्ते सत्येन मोहन गुंजाळ यांनी शेतकरी समस्यांसाठी शेतकरी सहवेदना असणाऱ्या कार्यकर्त्यांसह दिवसभर अन्नत्याग केला. संध्याकाळी महात्मा फुले नाट्यगृहाबाहेरील महात्मा फुले दांम्प्यत्याच्या पुतळ्यासमोर  आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना श्रध्दांजली वाहून शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी आयुर्वेदभूषण डॉ सुरेश कांबळे यांनी जगाच्या अन्नदाता म्हणवल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची सगळ्याच स्तरावर कशी उपेक्षा होते, याचे वर्णन करून खरी सहवेदना व्यक्त करायची असेल तर प्रत्येकाने शेतकऱ्यासाठी योगदान कोणत्या ना कोणत्या स्वरुपात देऊन शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. कांबळे, विश्वलता महाविद्यालयाचे विश्वस्त भूषण लाघवे, दीपक देशमुख, विजय खोकले, बाळासाहेब देशमुख, गणेश पंडित, सुभाष 
गांगुर्डे, गोटू मांजरे, मधुसूदन राका, सुमित थोरात, मायराम नवले, राजू खैरनार, राजू संसारे, दिपक गुंजाळ आदी सहभागी झाले होते.

"अन्नदाता असलेला बळीराजाच्या पदरी नेहमीच या ना त्या कारणाने हेटाळणीच पडत आहे. येवला हे शेतकरी चळवळीचे केंद्र होते अन् आजही आहे, त्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रस्थापित राजकर्त्यावर शेतकऱ्यांचा आसूड उगारणाऱ्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग या एकदिवसीय उपोषण केले."
- सत्येन मोहन गुंजाळ,उपोषणार्थी

Web Title: Nashik news farmer agitition in yeola

टॅग्स