कर्ज मंजूर करून शेतकऱ्याची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नाशिक - देवळाली कॅम्प येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राचे तत्कालीन व्यवस्थापकासह पाच जणांनी इगतपुरीच्या शेतकऱ्याला शासकीय कर्ज मंजूर करून, सहा लाख 64 हजार 500 रुपयांची रक्कम परस्पर हस्तांतर करून फसवणूक केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत संबंधित व्यवस्थापकासह पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी दौलत किसन कांबळे (रा. टाकेद, ता. इगतपुरी) या शेतकऱ्याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2014 मध्ये झाला आहे. संशयित शिवाजी एकनाथ केकणे (रा. शिवतीर्थ डोरी, कवडवस), हरसिंदभाई चौधरी, दिनेशभाई अवजीभाई चौधरी (दोघे रा. मेवाड, जि. मेहसाना, गुजरात), भैरू किसन (रा. टाकेद, ता. इगतपुरी) यांनी शासकीय योजनेतून कर्ज मंजूर करून देण्याचे कांबळे यांना आमिष दाखविले. त्याप्रमाणे कांबळे यांचे कर्जप्रकरण देवळाली कॅम्पच्या बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून मंजूर करण्यात आले. मात्र, मंजूर कर्जाची रक्कम हरसिंदभाई व दिनेशभाई चौधरी यांनी परस्पर हस्तांतरित केली. बॅंकेच्या तत्कालीन व्यवस्थापकाने कर्जप्रकरण त्यांच्या ताब्यात असतानाही संशयितांशी हातमिळवणी करून, त्यांच्या खात्यावर सहा लाख 64 हजार 500 रुपयांची रक्कम जमा केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर या सर्वांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: nashik news farmer cheating