शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जेलभरो आंदोलन - रघुनाथदादा पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

नाशिक - सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी रडकुंडीला आले आहेत. अधिक उत्पादन हाच खरा प्रश्‍न तयार झाला असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्पादन वाढवा म्हणताहेत. ही त्यांची जाणीवपूर्वक असंवेदनशीलता असून, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जेलभरो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी आज येथे दिला. 

दरम्यान, शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेच्या समारोपानिमित्त २७ एप्रिलला पुण्यातील महात्मा जोतिबा फुले यांच्या वाड्यात राज्यस्तरीय शेतकरी मेळावा होईल, असेही त्यांनी सांगितले. 

हुतात्मा स्मारकामध्ये शहिदांना अभिवादन केल्यानंतर नाशिक बाजार समितीमध्ये शेतकरी संवाद सभा झाली. पाटील म्हणाले, की शेतीमालाचे भाव ठरविण्यासाठी ट्रुब्युनल असावे ही घटनात्मक तरतूद आहे; पण देशात शेतीचे भाव ठरविण्यासाठी कृषी मूल्य आयोग नेमला आहे. हा आयोग उत्पादन खर्चाइतकाही भाव देत नसल्याने देशात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. पण त्याबाबत सरकार गंभीर नाही. देशात शेतीची वाट लागून सेवा क्षेत्राची भरभराट सुरू आहे. त्यातून कवडीमोल दराने खरेदी केलेल्या शेतीच्या उत्पादनावर निर्माण होणाऱ्या उत्पादनांचा पैसा ठरावीक लोकांच्याच हातांत जातो आहे. सरकारी तिजोरीतील पैसावाटप सदोष आहे.

सरकारच्या घोषणा फसव्या
निर्यातबंदीमुळे जगभरातील विविध देशांच्या तुलनेत भारतातील शेतीमालाचे भाव खूपच कमी आहेत, असे सांगून पाटील यांनी सरकारच्या फसव्या घोषणांचा पाढा वाचला. ते म्हणाले, की शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कृषी उत्पादनावरील निर्यातबंदी उठविली पाहिजे. शेतीवर दरोडा टाकून उद्योजक जगविण्याचे धोरण बदलले पाहिजे. उत्पादन खर्चावर पन्नास टक्के अधिकचा नफा मिळायला हवा.

Web Title: nashik news farmer Raghunathdada Patil Jail Bharo movement on farmers issue