शेतकरी हवालदील; दिवाळीतही बाजारपेठेत शुकशुकाट

दिगंबर पाटोळे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

कर्जमाफीचा अॉनलाईन अर्ज भरण्यासाठी रांगेत उभे राहून रात्रीचा दिवस केला. मात्र दिवाळीही अाली मात्र कर्ज माफीचा एक दमडाई अद्याप हातात आला नाही. दुसरीकडे नोटाबंदी व जीएसटीमुळे यंदा व्यापारी भयंकर हैराण झाले आहेत. जीएसटीनंतर अनेक उत्पादनांच्या किंमती वाढल्याने ग्राहक दुकानांमध्ये फिरकेनासे झालेत.

वणी (नाशिक) : ग्रामिण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असून अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या दिपाेत्सवावर अनुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे हवालदील झालेला बळीराजा उरले सुरले पीक वाचविण्यासाठी शेतातच अडकल्याने ग्रामिण भागातील बाजारपेठेत एेन दिवाळीत शुकशुकाट निर्माण झाल्याने व्यवसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दसरा झाल्यानंतर श्रीमंत असो वा गोरगरीब आपल्या परिस्थिती प्रमाणे दिपावली साजरी करण्याच्या तयारीला लागतो. पाच -सहा दिवसांवर दिपावली आली की प्रत्येक जण कपडे, फराळाचे साहित्य, मिठाई आदि साहित्यासह इतर वस्तु खरेदी करण्यासाठी बाजारपेठामध्ये जातात. त्यामुळे बाजारपेठा ग्राहकांना गजबजुन गेल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. मात्र यंदा  दोन तीन दिवसावर दिपावली असल्याने बाजार पेठांमध्ये मात्र शुकशुकाट दिसून येत आहे. नोटाबंदी पासून ग्रामिण भागातील बाजारपेठांवर मोठा परीणाम झाला होता. त्यानंतर बाजारपेठा काहीशा सावरत नाहीत तोच शेती मालाला भाव नसल्यामुळे बळीराजाच्या संकटात वाढ होतच गेली. त्यात कर्जबाजारी असलेला शेतकरी अधिक कर्जबाजारी होत गेला आणि कर्ज माफी व इतर मागण्यांसाठी यासाठी संपावर गेला. याचे फलित म्हणून सरकारने अनेक अटी शर्ती लागून सरसगट कर्ज माफीची घोषणा केली.

कर्जमाफीचा अॉनलाईन अर्ज भरण्यासाठी रांगेत उभे राहून रात्रीचा दिवस केला. मात्र दिवाळीही अाली मात्र कर्ज माफीचा एक दमडाई अद्याप हातात आला नाही. दुसरीकडे नोटाबंदी व जीएसटीमुळे यंदा व्यापारी भयंकर हैराण झाले आहेत. जीएसटीनंतर अनेक उत्पादनांच्या किंमती वाढल्याने ग्राहक दुकानांमध्ये फिरकेनासे झालेत.

बाजारपेठांमध्ये ग्राहक नसल्याने मोठ्या संकटात व्यापारी सापडले आहेत. समाधानकारक पावसाने खरीप पिके बऱ्यापैकी बहरत असतांना परतीच्या पावसाने जोरदार तडका देत तोंडाशी अालेला घास दुर व्हावागत अशी अवस्था झाल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. आधीच संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा नुकसानीच्या खाईत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून यंदाची दिवाळी ही महागाईच्या सावटात व नोटबंदी, जीएसटी आणि शेतकर्‍यांचे नुकसान या सावटाखाली साजरी होणार असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

Web Title: Nashik news farmer unrest on loan waiver