शेतकरी संपावर भाजली विक्रेत्यांनी पोळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

लॅम रोड - शेतकरी आजपासून संपावर गेले असले, तरी दुसरीकडे नाशिक रोड भागातील भाजी बाजारातील भरेकऱ्यांनी व विक्रेत्यांनी आपली पोळी भाजून घेत भाज्यांचे दर एकाच दिवसात वाढविले. अव्वाच्या सव्वा लावलेल्या दरांमुळे भाजी बाजाराकडे आज ग्राहकांनी पाठ फिरवली.

शेतकऱ्यांचा संप आजपासून सुरू झाल्यानंतर पालेभाज्यांचे दर खरे तर दोन दिवसांनी वाढणार असल्याचे चिन्ह असताना येथील बाजारात मात्र याच संपाचा फायदा घेत अनेक भरेकरी व विक्रेत्यांनी दोन दिवसांचा साठा खरेदी करून दर वाढविल्याने ग्राहकही सकाळी अचंबित झाले. सकाळपासून संप सुरू झाला असताना हे दर कसे वाढले, असा सवाल उपस्थित होत आहे.

दुर्गा उद्यान, बिटको उड्डाणपुलाखाली भरणारा भाजी बाजार, जेल रोड येथे पालेभाज्यांचे दर एकाच दिवसात गगनाला भिडले आहेत.

हॉटेलचालकांची गैरसोय
बहुतांश हॉटेलमध्ये टोमॅटो, वांगे, कोबी, ढोबळी मिरची, फ्लॉवर, श्रावण घेवडा या भाज्यांची मागणी जास्त असते. मात्र, संपामुळे छोटे-मोठे हॉटेलचालक, चायनीज व पावभाजी विक्रेते यांना या दरवाढीचा फटका बसला असून, एक-दोन दिवसांत दर वाढविण्यात येईल, अशी शक्‍यता काही हॉटेलचालकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या संपामुळे पालेभाज्यांची आवक एकाच दिवसात कमी कशी काय झाली व त्याचे दर विक्रेत्यांनी कसे काय वाढविले? ग्राहकांची पिळवणूक करण्याचे धोरण शेतकऱ्यांऐवजी स्थानिक विक्रेत्यांनी अवलंबल्याचे दिसून येत आहे.
- सुनीता पिंगळे, ग्राहक

भाज्यांचे एकाच दिवसात वाढलेले दर पुढीलप्रमाणे 
हिरवी मिरची- ८० रुपये किलो, भोपळा- २० रुपये नग, कोथिंबीर- २० ते ४० रुपये जुडी, वांगे- ८० रुपये किलो, श्रावण घेवडा- १२० रुपये किलो, बटाटे- २० रुपये किलो, कांदे- १५ ते २० रुपये किलो, ढोबळी मिरची- ६० ते ७० रुपये किलो, पालक- २० रुपये जुडी.

Web Title: nashik news farmer vegetables