शीतपेयात दोष आढळल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

नाशिक रोड - गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांना शीतपेय प्यायल्याने झालेल्या विषबाधेप्रकरणी सखोल अहवाल तयार करून दोषी आढळल्यास शाळेच्या व्यवस्थापकांवर कारवाई केली जाईल, असे उपशिक्षणाधिकाऱ्यांनी तसेच शीतपेयात दोष आढळल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध विभागाच्या निरीक्षकांनी सांगितले.

घटनेची गंभीर दखल घेत शनिवारी (ता. २०) माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी आर. पी. पाटील, अन्न व औषध निरीक्षक विवेक पाटील आणि शीतपेय कंपनीचे व्यवस्थापक सी. एन. नाईक यांनी शाळेला भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेरील खाद्यपदार्थ देऊ नये. तसेच वाढदिवस, स्मृतिदिन आणि इतर कार्यक्रमात वाटण्यात येणारे पदार्थ विद्यार्थ्यांना देऊ नये, याबाबत मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक सर्व शाळांना पाठविले जाईल, असे उपशिक्षणाधिकारी पाटील यांनी सांगितले. पचनशक्तीत कमतरता असल्याने पंधराच विद्यार्थ्यांना त्रास झाला. तर उर्वरित ३८५ विद्यार्थ्यांना हा त्रास झाला नाही, असा दावा शीतपेय कंपनीचे सी. एन. नाईक यांनी केला. 

बिटको शाळेतील विद्यार्थ्यांना शुक्रवारी दुपारी एका कंपनीने प्रमोशनसाठी मोफत शीतपेय पिण्यासाठी दिले. परंतु सायंकाळी काही विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होऊन त्रास झाला. 

Web Title: nashik news FDA Cold drink