नाशिकः पंचवटीत गोळीबार; एक जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

नाशिक : पंचवटीतील पेठरोडवरील फुलेनगर येथे अज्ञात व्यक्तीने गावठी कट्टयातून गोळी झाडल्याने एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. सदरची घटना आज (गुरुवार) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. पोलिस गोळी झाडणाऱ्या संशयितांचा शोध घेत असून, जखमीवर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिक : पंचवटीतील पेठरोडवरील फुलेनगर येथे अज्ञात व्यक्तीने गावठी कट्टयातून गोळी झाडल्याने एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. सदरची घटना आज (गुरुवार) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. पोलिस गोळी झाडणाऱ्या संशयितांचा शोध घेत असून, जखमीवर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठरोडवरील फुलेनगरच्या ध्वनंतरी हॉस्पिटलनजिक दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गावठी कट्टयातून गोळी झाडल्याचा प्रकार घडला. यामध्ये संदीप लाड याच्या छातीच्या उजव्या बाजुला गोळी लागल्याचे समजते. त्याला तात्काळ पंचवटीतील संजीवनी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे, पंचवटी व म्हसरुळचे पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार करणाऱ्या संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. जखमी संदीप लाड हा देखील गुन्हेगार असून, त्याच्यावर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
तीन दिवसांच्या बलात्कारानंतर महिलेस खावे लागले स्वत:चे बाळ...
लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
ऑनलाईन असे जोडा ‘आधार’ आणि ‘पॅन कार्ड’
मी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी
Web Title: nashik news firing in panchwati