अवयवदानासाठी प्राथमिक सुविधांवर भर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

डॉ. मनोज दुराईराज - नाशिकमध्ये प्रमाण वाढण्यासाठी मेळावे, शिबिरांद्वारे जनजागृती

नाशिक - पुण्यातील पहिल्या हृदय प्रत्योरापणात सहभागी असलेले हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज यांनी नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये अवयवदानासाठी प्राथमिक सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात रुग्णालयांची नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मेळावे आणि शिबिरांद्वारे ते अवयवदानाची जनजागृती करणार आहेत.

हॉटेल ग्रीन व्ह्यूमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. दुराईराज यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की देशात वर्षभरात हृदयाचा प्रश्‍न असलेल्या एक लाख ८० हजार बालकांचा जन्म होतो. त्यांच्यासाठी २०० कार्डिआक केंद्रांची गरज आहे. प्रत्यक्षात ३० केंद्रे उपलब्ध आहेत. मार्च २०१७ पासून त्यांनी सात हृदयांचे प्रत्यारोपण केले आहे. त्यातील दोन दाते नाशिकचे आहेत. 

नाशिक जिल्ह्यातून गेल्या वर्षी दोन दात्यांनी पुण्यातील दोघांना अवयवदान केल्याने पुण्यातील रुग्णांना जीवनदान मिळाले. आता नाशिक जिल्ह्यातून अवयवदान करणाऱ्यांचे प्रमाण वाढावे म्हणून अवयवदानातील गैरसमज दूर केले जाणार आहेत.

डोळे, फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंड, यकृत इत्यादी अवयवांचे दान होऊ शकते. जानेवारी २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत पुण्यात ३१ अवयवदान झाले. मुंबईत ३१, औरंगाबादमध्ये तीन आणि नागपूरमध्ये सहा अवयवदान झाले, असे सांगून ते म्हणाले, की नाशिकमध्ये अनेक चांगली रुग्णालये आहेत. अशा रुग्णालयांमध्ये अवयवदानासाठी अर्ज ठेवले पाहिजेत. अवयव आवश्‍यक असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्या तुलनेत अवयवदान करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी पुण्यात ५६, मुंबईत ५३ अवयवदान झाले. त्यातून ७६ जणांना जीवनदान मिळाले. एकदा अवयवदान करण्याचा निर्णय झाल्यानंतर प्राप्तकर्त्याला बोलविले जाते. दाता आणि प्राप्तकर्त्यावर एकाच वेळी शस्त्रक्रिया सुरू होते. दात्याचे हृदय शरीरातून काढल्यावर तीन तासांच्या आत प्राप्तकर्त्याच्या शरीरात रोपण केले जाते. 
हृदय हा स्नायूंनी बनलेला धडधडता अवयव आहे. त्याला तीन ते चार तास रक्तपुरवठा मिळाला नाही, तर ते धडधडणे बंद होते. त्यामुळे हृदय त्याच्या जागी शक्‍य तितक्‍या लवकर पोचवण्यासाठी सर्व साधनांचा वापर करावा लागतो. महाराष्ट्र पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. 

Web Title: nashik news Focus on elementary care for organisms