पाच जिल्ह्यांत लवकरच "मिनी लॅब' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

नाशिक - राज्यात मुंबईसह पाच प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळा असल्याने अन्य जिल्ह्यांतून गुन्ह्यांतील नमुने चाचणीसाठी संबंधित ठिकाणी ने-आण करण्यामध्ये वेळेचा खूपच अपव्यय होतो. यावर मात करण्यासाठी लवकरच पाच जिल्ह्यांमध्ये "मिनी लॅब' कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे संचालक के. व्ही. कुलकर्णी यांनी "सकाळ'शी बोलताना गुरुवारी दिली. 

दिंडोरीरोडवरील प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये सुमारे 5 कोटी रुपयांची "डीएनए' चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली. या वेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले, ""या डीएनए चाचणी प्रयोगशाळेमुळे नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील डीएनए नमुन्यांची तपासणी होणार आहे. आजमितीस राज्यातील नाशिक वगळता मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील प्रयोगशाळेकडे विविध चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. डीएनएचे सुमारे 3 हजार अहवाल प्रलंबित आहेत. बहुतेक चाचण्या या प्राथमिक चाचणीमध्येच निदान होतात. परंतु त्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर अशा लांबच्या ठिकाणी नमुन्यांचा प्रवास होतो. प्रवासाचा हा अपव्यय टाळण्यासाठी राज्यातील धुळे, रत्नागिरी, ठाणे, चंद्रपूर व सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये "मिनी लॅब' सुरू करण्याचा प्रस्ताव असून, त्यानुसार लवकरच लॅब सुरू होतील.'' 

नाशिक विभागात नगर आघाडीवर 
नाशिक विभागातून मुंबईच्या फॉरेन्सिक लॅबकडे गेल्या सात महिन्यात 350 डीएनए चाचणीचे नमुने पाठविण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक नमुने हे नगर जिल्ह्यातील आहेत. खून, बलात्कार, अनोळखी व्यक्तीचे डीएनए आदी स्वरूपाच्या गुन्ह्यांतील रक्ताचे नमुने, केस, हत्यारावरील रक्त, एकापेक्षा अधिक व्यक्तींनी बलात्कार केला असेल तर नमुन्यांची चाचणी करून डीएनए रिपोर्ट दिला जातो. 

Web Title: nashik news Forensic Laboratory