सफर ‘गडकिल्ल्यांवरील बाप्पाची’!

आनंद बोरा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेत मोलाचा वाटा असलेल्या गडकिल्ल्यांवर वेगवेगळ्या स्वरूपातील गणरायांचे दर्शन घडते. गडकोटांच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी पाहायला मिळते. किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर एका-दोन्ही बाजूला अथवा मधोमध एखादे चिन्ह अथवा शिल्प कोरलेले दिसते. द्वारशिल्पामध्ये अनेक ठिकाणी गणरायाच्या कोरीव मूर्ती दृष्टिक्षेपात येतात.

गडकिल्ल्यांनी समृद्ध असलेला नाशिक जिल्हा. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ६५ पर्यंत गडकिल्ले असलेल्या जिल्ह्यातील चढाईसाठी अवघड असलेल्या किल्ल्यांची अवस्था बिकट आहे. मात्र किल्ल्यावरील गणरायाच्या मूर्ती चांगल्या अवस्थेत आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणी गणेशभक्तांमधून होत आहे. सह्याद्रीची डोंगररांग दोन भागांत विभागली गेली. पूर्वेकडील रांगेला कळसूबाईची रांग म्हटले जाते. पश्‍चिमेकडील रांगेत त्रिंगलवाडी, कावनई, हरिहर, ब्रह्मगिरी, अंजनेरी हे किल्ले येतात. ब्रह्मगिरीच्या किल्ल्यावरून गोदावरी नदीचा उगम होत असल्याने साऱ्यांच्या दृष्टीने हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

सह्याद्रीमधील दुर्गम किल्ला असलेल्या हरिश्‍चंद्रगडाला कडेकपाऱ्यांचे संरक्षण लाभलेले आहे. याच पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला म्हणून ओळखल्या जाणारा साल्हेर किल्ला चारही बाजूंनी कातळकड्यांनी वेढलेला आहे. डोलबारी पर्वतरांगांमध्ये मुल्हेर किल्ला आहे. कळसूबाई डोंगररांगेतील किल्ला त्रिंगलवाडी. नाशिकपासून जवळ असलेल्या पाबर किल्ल्याच्या परिसरात गुहा, तळी आणि तुटलेले बुरूज दृष्टिक्षेपात येतात. मालेगाव तालुक्‍यातील गाळणा किल्ला ब्रिटिशकाळात खानदेशातील उत्तम हवेचे ठिकाण म्हणून उपयोगात आणले जात होते.

Web Title: nashik news fort