इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा ‘रास्ता रोको’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

जुने नाशिक - पेट्रोल, डिझेल दरवाढीसह वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेतर्फे द्वारका चौकात शनिवारी (ता. २७) ‘रास्ता रोको’ करण्यात आला. पाऊणतास सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी जेलभरो केल्याने आवरते घ्यावे लागले. वाहतूक रोखण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चौकाच्या चारही बाजूने येत ‘रास्ता रोको’चा प्रयत्न केला. तत्पूर्वी पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केला.  

जुने नाशिक - पेट्रोल, डिझेल दरवाढीसह वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेतर्फे द्वारका चौकात शनिवारी (ता. २७) ‘रास्ता रोको’ करण्यात आला. पाऊणतास सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी जेलभरो केल्याने आवरते घ्यावे लागले. वाहतूक रोखण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चौकाच्या चारही बाजूने येत ‘रास्ता रोको’चा प्रयत्न केला. तत्पूर्वी पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केला.  

भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळविण्यासाठी जनतेला वेगवेगळी आश्‍वासने दिली. जनतेने त्यांच्या आश्‍वासनाला भुलून त्यांना बहुमताने निवडून दिले. मोदी सरकारने तीन वर्षांच्या काळात निराशाच केली. राज्य सरकारनेही ‘हम करे सो कायदा’ सुरू ठेवत महागाईत वाढ केली. दोन्ही सरकारकडून दिलेली आश्‍वासने केवळ थापा असल्याचे सांगत ‘कहाँ है अच्छे दिन’ असे प्रश्‍न उपस्थित करून शिवसैनिकांनी आज जोरदार घोषणाबाजी करत काळ्या फिती लावून आंदोलन केले. सरकारला जाग आणण्यासाठी घंटानादही केला.

सर्व आश्‍वासने खोटी ठरल्याच्या निषेधार्थ सरकारला गाजर दाखव आंदोलनही केले. पाऊणतास आंदोलन झाले. पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले. या वेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये काही वेळ वाद झाला. पोलिसांनी त्यांना न जुमानता जेलभरो करत मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल केला. 

आमदार योगेश घोलप, गटनेते विलास शिंदे, उपनेते बबनराव घोलप, राजू लवटे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, आर. डी. धोंगडे, प्रवीण तिदमे, प्रशांत दिवे, सुधाकर बडगुजर, दीपक दातीर, संतोष गायकवाड, सूर्यकांत लवटे, सुदाम डेमसे, श्‍याम साबळे, भागवत आरोटे, चंद्रकांत खोडे, सुनील गोडसे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, कल्पना पांडे, मंगला आढाव, शामला दीक्षित, पूनम मोगरे, नयन गांगुर्डे, सुवर्णा मटाले, सीमा निगळ, संगीता जाधव, हर्षदा गायकर, रंजना बोराडे, मनीषा हेकरे, संजय चव्हाण, अजीम सय्यद, देवानंद बिरारी, दिगंबर मोगरे, योगेश बेलदार, नितीन चिडे, आशिष साबळे, राहुल ताजनपुरे, बबलू शेख, अशोक संगमनेरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

‘अच्छे दिन’ आणण्याचा सरकार दावा करते. कुठे आहेत ‘अच्छे दिन’?, सरकार केवळ थापा मारत आहे. तीन वर्षांत सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे.
- विजय करंजकर, जिल्हाप्रमुख

शेजारील राज्यामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी आहेत. राज्यातच इतकी दरवाढ का? अन्य वस्तूच्या किमतीतही झालेली दरवाढ सामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. यास सर्वस्वी सरकार जबाबदार आहे.
- हेमंत गोडसे, खासदार

जीएसटी, नोटाबंदी फसली आहे. देशाचा विकासदर घटला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमतीतील वाढ कंबरडे मोडणारी आहे. भाववाढ कमी झाली नाही, तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- अजय बोरस्ते, महानगरप्रमुख

Web Title: nashik news fuel rate oppose rasta roko by shivsena